IND vs ENG 1st TEST : लंचपर्यंत इंग्लंडची वाईट अवस्था, संघाला सावरण्यासाठी रूट मैदानात

उपाहारापर्यंत इंग्लंडने २५ षटकात २ बाद ६१ धावा केल्या आहेत.

india vs england first test lunch report
भारत वि. इंग्लंड पहिली कसोटी

नॉटिंगहॅममध्ये भारत आणि इंग्लंड संघात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाच्या उपाहारापर्यंत इंग्लंडने २५ षटकात २ बाद ६१ धावा केल्या आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेला पराभव विसरून भारतीय संघ नव्या हंगामाची सुरुवात विजयाने करू इच्छित आहे. या व्यतिरिक्त, विराटसेना इंग्लंडच्या भूमीवर पहिली मालिका जिंकण्यासाठी आतूर असेल.

उपाहारापर्यंत इंग्लंडची वाईट अवस्था

इंग्लंडकडून रोरी बर्न्स आणि झॅक क्रॉले यांनी सलामी दिली. भारताचा तेजतर्रार गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. बर्न्सला बुमराहने शून्यावर पायचित पकडले. बर्न्सने पाच चेंडू खेळले, पण त्याला एकही धाव घेता आली नाही. बर्न्सनंतर झॅक क्रॉले मैदानात आला. तो स्थिरावला असताना मोहम्मद सिराजने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. क्रॉलेने ४ चौकारांसह २७ धावा केल्या. उपाहारापर्यंत सिब्ले १८ आणि कर्णधार जो रूट १२ धावांवर नाबाद आहेत.

 

कोण आत कोण बाहेर?

फिरकीपटू आर. अश्विन आणि इशांत शर्मा यांना या कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. दुसरीकडे, केएल राहुल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज यांना संधी मिळाली आहे. रवींद्र जडेजाचा फिरकीपटू म्हणून संघात समावेश आहे. भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजांसह हा सामना खेळत आहे, तर इंग्लंडने त्यांच्या संघात एकाही फिरकी गोलंदाजाचा समावेश केलेला नाही.

हेही वाचा – भिडल्या… लढल्या! अटीतटीच्या झुंजीत अर्जेंटिनाचा विजय; भारताची आता कांस्यपदकावर नजर

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारतीय संघ – रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार),  ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह,  मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, केएल राहुल.

इंग्लंडचा संघ – जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉमिनिक सिबली, जोस बटलर, सॅम करन, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, झॅक क्रॉली, ओली रॉबिन्सन.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India vs england first test first day lunch report adn

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या