भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिरेकीव २८ मार्च रोजीचा अखेरचा सामना पुण्याहून मुंबईत स्थलांतरित करण्याबाबत भारतीय नियामर मंडळ (बीसीसीआय) गांभिर्यानं विचार करत आहे. इंग्लंडच्या संघाला मायदेशी रवाना होण्यास सोपं जावं, या उद्देशानं हा सामना मुंबई खेळवण्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. मात्र, अंतिम निर्णय झालेला नाही, असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं गुरुवारी स्पष्ट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगणार असून महाराष्ट्र क्रिकट संघटना सज्ज झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संपूर्ण मालिकेचं आयोजन पुण्यामध्ये पहिल्यांदाच होत आहे. हे सामने २३, २६ आणि २८ मार्च रोजी खेळवण्यात येणार आहेत, अशी माहिती एमसीएचे अध्यक्ष विकास काकतकर यांनी दिली. या मालिकेसाठी तीन मुख्य खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक सामना स्वतंत्र खेळपट्टीवर खेळवण्यात यईल, असेही काकतकर यांनी सांगितलं.

आणखी वाचा- IND vs ENG : मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी बुमराहला विश्रांती; सूर्यकुमारला संधी

प्रेक्षकांबाबतटा निर्णय मार्च महिन्यातच –
स्टेडियममध्ये किती टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीची परवानगी मिळेल, याबाबतचा निर्णय मार्च महिन्यातच होईल, असा अंदाज आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार आणि निर्णयानंतरच स्टेडिअमचे तिकीट शुल्क आणि त्याची आसनक्षमता याचा अंदाज घेऊन त्याविषयीची घोषणा करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs england third odi could be shifted from pune to mumbai says maharashtra cricket association nck
First published on: 19-02-2021 at 11:06 IST