भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मुंबईचा प्रतिभावान फलंदाज सूर्यकुमार यादवला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे. उभय संघांत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर पाच ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय लढती खेळवण्यात येणार आहेत. १२ मार्चपासून अहमदाबाद येथे ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘बुमराने गेल्या काही काळात सातत्याने भारताच्या तिन्ही संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे त्याच्यावरील भार हलका करण्यासाठी मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी बुमराला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याशिवाय ऋषभ पंतचे संघातील पुनरागमन निश्चित मानले जात असून सूर्यकुमारलाही यंदा प्रथमच संजू सॅमसनच्या जागी संघात स्थान मिळू शकते,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

सर्व टी-२० सामने अहमदाबादच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहेत…. पाहा वेळापत्रक

१२ मार्च – पहिला टी-२० सामना, भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता

१४ मार्च – दुसरा टी-२० सामना, भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता

१६ मार्च – तिसरा टी-२० सामना, भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता

१८ मार्च – चौथा टी-२० सामना, भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता

२० मार्च – पाचवा टी-२० सामना, भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng t20 series 2021 jaspreet bumrah surya kumar yadav nck
First published on: 19-02-2021 at 09:07 IST