IND vs NZ : विश्वचषक २०२३ च्या सेमी फायनलमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड हे दोन देश भिडले. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सामना मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर रंगला होता. भारताने न्यूझीलंडवर ७० धावांनी विजय मिळवला आणि सगळ्या भारताने पुन्हा एकदा जोरदार दिवाळी साजरी केली. विराट कोहली, श्रेयस अय्यर यांची शतकी खेळी आणि मोहम्मद शमीने घेतलेल्या सात विकेट्स हा विषय चर्चेचा ठरला.

न्यूझीलंडच्या संघाचा पराभव झाला असला तरीही त्यांचं कौतुक करावं लागेलच. कारण भारताने ३९७ धावांचा डोंगर रचूनही न्यूझीलंडने ३००+ धावा करत उत्तम पाठलाग कसा करायचा हे दाखवून दिलं. रोहितसह विराट, श्रेयस यांनी मारलेले षटकारही चर्चेत राहिले. मात्र ही सेमीफायनल कायमच स्मरणात राहणार आहे. कारण या सेमी फायनलमध्ये एक दोन नाही तर तब्बल १८ रेकॉर्ड झाले आहेत. कोणते आहेत ते रेकॉर्ड चला जाणून घेऊ.

match prediction ipl 2024 royal challengers bangalore match against sunrisers hyderabad today
IPL 2024 : बंगळूरुसमोर विजयाचे आव्हान; सनरायजर्स हैदराबादशी आज गाठ; हेड, कोहलीकडून अपेक्षा
Royal Challengers Bangalore Vs Kolkata Knight Riders Match Highlights in Marathi
KKR vs RCB : रोमहर्षक सामन्यात केकेआरचा आरसीबीवर एका धावेने निसटता विजय, विल जॅक्सची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अ‍ॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

रेकॉर्डची सुरुवात केली विराट कोहलीने

११३ चेंडूंमध्ये ११७ धावांची खेळी केली ती विराट कोहलीने. ही खेळी करत विराटने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला आहे. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम सचिनच्या नावे होता. सचिनने वन डे क्रिकेटमध्ये ४९ शतकं केली होती. विराटने ५० वं शतक करत सचिनचा रेकॉर्ड मोडला. वन डे सामन्यात ५० शतकं ठोकणारा विराट हा जगातला पहिला क्रिकेटर ठरला आहे.

विश्वचषक २००३ मध्ये सचिनने ६७३ धावा केल्या होत्या. विराटने कोहलीचा हा रेकॉर्डही मोडला आहे. आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये विराटने ७११ धावा केल्या आहेत.

एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक शतकं करणारे फलंदाज

विराट कोहली २७९ इनिंग्जमध्ये ५० शतकं
सचिन तेंडुलकर ४५२ इनिंग्ज ४९ शतकं
रोहित शर्मा २५३ इनिंग्ज ३१ शतकं
रिकी पॉटिंग ३६५ इनिंग्ज- ३० शतकं
सनथ जयसूर्या ४३३ इनिंग्ज- २८ शतकं

विश्वचषक स्पर्धेतल्या एका सामन्यात सर्वाधि षटकार

इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान २०१९- ३३ षटकार
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड २०२३- ३२ षटकार
न्यूझीलंड विरुद्ध वेस्टइंडिज-२०१५-३१ षटकार
साऊथ अफ्रिका विरुद्ध श्रीलंका-२०२३-३२ षटकार
भारत विरुद्ध न्यूझीलंड २०२३ सेमी फायनल-३० षटकार

विश्वचषकाच्या सामन्यात सर्वात मोठा स्कोअर (दोन्ही डाव मिळून)

ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड २०२३- ७७१ धावा
साऊथ अफ्रिका विरुद्ध श्रीलंका २०२३- ७५४ धावा
भारत विरुद्ध न्यूझीलंड, सेमीफायनल २०२३- ७२४ धावा

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याचा रेकॉर्ड

ऑस्ट्रेलिया २००३- ११ सामने
ऑस्ट्रेलिया २००३-११ सामने
भारत (विश्वचषक २०२३)- आत्तापर्यंत १० सामने
भारत – २००३- ९ सामने
श्रीलंका २००७- ८ सामने
न्यूझीलंड २०१५-८ सामने

विश्वचषकात सलग सामने जिंकण्याचं रेकॉर्ड

ऑस्ट्रेलिया २५ (१९९९ आणि २०११)
भारत ११ (२०११ आणि २०१५)
भारत १० (विश्वचषक २०२३ मध्ये आत्तापर्यंत सलग मिळालेले विजय)
वेस्टइंडिज-९ (१९७५ आणि १९७९)

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड

रोहित शर्मा (२०२३)- २८ षटकार
क्रिस गेल (२०१५)- २६ षटकार
श्रेयस अय्यर (२०२३)- २४ षटकार
ओएस मोर्गन (२०१९)- २२ षटकार
ग्लेन मॅक्सवेल (२०२३)- २२ षटकार
डेरेल मिचेल (२०२३)- २२ षटकार

वन डे सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू

७ विकेट्स – मोहम्मद शमी, भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना २०२३
६ विकेट्स स्टुअर्ट बिन्नी – बांगलादेशच्या विरोधात २०१४
६ विकेट्स- अनिल कुंबळे- वेस्टइंडिजच्या विरोधात-१९९३
६ विकेट्स -जसप्रीत बुमराह इंग्लंडच्या विरोधात-२०२२
६ विकेट्स- मोहम्मद सिराज, श्रीलंकेविरोधात- २०२३

विश्वचषक स्पर्धेत आशिष नेहराने २३ धावा देत ६ विकेट्स काढल्या होत्या. २००३ मध्ये इंग्लंड विरोधातल्या सामन्यात ही कामगिरी त्याने केली होती. आता मोहम्मद शमीने नेहराचा विक्रम मोडला आहे.

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड

२७ विकेट्स -मिचेल स्टार्क (२०१९)
२६ विकेट्स – ग्लेन मॅग्रा (२००७)
२३ विकेट्स -चमिंडा वास (२००३)
२३ विकेट्स, मुथ्थया मुरलीधरन (२००७)
२३ विकेट्स, शॉन टेट (२००७)
२३ विकेट्स मोहम्मद शामी (२०२३)

२०११ मध्ये झहीर खानने विश्वचषक स्पर्धेत २१ विकेट्स घेतल्या होत्या. मोहम्मद शमीने हा रेकॉर्ड मोडला आहे.

विश्वचषकात एका सामन्यात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड

७ विकेट्स, ग्लेन मॅक्ग्रा (२००३)
७ विकेट्स, अँडी बिचेल (२००३)
७ विकेट्स , टीम साऊदी (२०१५)
७ विकेट्स , विन्सटन डेव्हिस (१९८३)
७ विकेट्स, मोहम्मद शमी (२०२३)

विश्वचषकाच्या नॉकआऊट सामन्यात एका मॅचमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड शमीने आपल्या नावे केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या गॅरी गिलमोरचा रेकॉर्ड त्याने मोडला आहे. १९७५ मध्ये गॅरीने इंग्लंडच्या विरोधात १४ धावा घेत ६ विकेट्स काढल्या होत्या.

शमी सर्वाधिक वेळा ५ विकेट घेणारा गोलंदाज

मोहम्मद शमीने आत्तापर्यंत ४ वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत.
मिचेल स्टार्कने आत्तापर्यंत ३ वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत.
एका वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक तीनवेळा पाच विकेट घेणारा शमी हा एकमेव गोलंदाज आहे.

न्यूझीलंडच्या विरोधात शुबमन गिलची खास खेळी

१४९ चेंडूत हैदराबादच्या सामन्यात २०८ धावा
५३ चेंडूत रायपूरच्या सामन्यात ४० धावा
७८ चेंडूत इंदूरमधल्या सामन्यात ११२ धावा
३१ चेंडूत धर्मशालाच्या सामन्यात २६ धावा
६६ चेंडूत मुंबईतल्या सेमीफायनलमध्ये नाबाद ८० धावांची खेळी

वर्ल्ड कप नॉकआऊट मॅचमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम

१९ षटकार- भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना, मुंबई १५ नोव्हेंबर २०२३
१६ षटकार-वेस्टइंडिज विरुद्ध न्यूझीलंड, २०१५
१५ षटकार- न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज, २०१५

वर्ल्ड कप नॉक आऊट मॅचमध्ये सर्वाधिक धावसंख्या

३९७ धावा- भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना, मुंबई २०२३
३९३ धावा-न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज, वेलिंग्टन, २०१५
३५९ धावा-ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, जोहान्सबर्ग, २००३
३२८ धावा, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, सिडनी, २०१५
३०२ धावा, भारत विरुद्ध बांगलादेश, मेलबर्न, २०१५

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची उत्तम धावसंख्या

४१३ धावा, बरमूडा ,पोर्ट ऑफ स्पेन विरोधात – २००७
४१० धावा, नेदरलँडविरोधात, २०२३
३९७ धावा , न्यूझीलंडविरोधात, २०२३
३७३ धावा, श्रीलंकेच्या विरोधात, १९९९

विश्वचषक सामन्यात भारतीय टीमचे सर्वाधिक षटकार

१९ षटकार, न्यूझीलंडविरोधात, २०२३
१८ षटकार, बरमूडा पोर्ट ऑफ स्पेन विरोधात, २००७
१६ षटकार, नेदरलँड्सविरोधात, २०२३

विश्वचषक स्पर्धेत एका मॅचमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे भारतीय फलंदाज

८ षटकार, श्रेयस अय्यर न्यूझीलंड विरोधात, २०२३
७ षटकार, सौरव गांगुली, श्रीलंकेविरोधात, १९९९
७ षटकार युवराज सिंग, बर्मूडा पोर्ट ऑफ स्पेन विरोधात, २००७

असे रेकॉर्ड्स सेमी फायनलच्या एका मॅचमध्ये झाले आहेत. भारताच्या या कामगिरीचं जगभरात कौतुक होतं आहे. आता रविवारी विश्वचषक स्पर्धेतचा अंतिम सामना आहे त्यात भारताविरोधात कोण असणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आजतकने हे वृत्त दिलं आहे.