India vs Pakistan Live Streaming Details: भारताचा संघ आज आशिया चषक २०२५ स्पर्धेत पाकिस्तानचा सामना करणार आहे. पहलगाम हल्ला झायानंतर ही पहिलीच वेळ असणार आहे. जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून भारतीय क्रिकेट चाहत्यांनी या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. पण भारत सरकारने हिरवं कंदील दाखवल्याने हा सामना नियोजित वेळेत खेळवला जाणार आहे. दरम्यान हा सामना केव्हा, कुठे आणि किती वाजता सुरू होईल? जाणून घ्या सर्वकाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा हाय व्होल्टेज सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या हाती असणार आहे. तर पाकिस्तानची धुरा सलमान अली आगाच्या हाती असणार आहे.
हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. तर नाणेफेक ७:३० वाजता होईल. जो संघ हा सामना जिंकेल त्या संघाला सुपर ४ मध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावताना दिसून येऊ शकतात. हा सामना लाईव्ह कुठे पाहता येणार असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल ना? तर जाणून घ्या.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा हाय व्होल्टेज सामना केव्हा खेळवला जाईल?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना रविवारी १४ सप्टेंबरला खेळवला जाईल.
भारत -पाकिस्तान सामना कुठे रंगणार आहे?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.
हा सामना किती वाजता सुरू होईल?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहे.
भारत – पाकिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
यावेळी आशिया चषक स्पर्धेतील सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रक्षेपित केले जात आहेत. यासह तुम्ही डीडी स्पोर्ट्सवर हा सामना फुकटात पाहू शकता.
हा सामना ऑनलाइन कुठे पाहता येणार?
हा सामना तुम्ही सोनी लिववर लाईव्ह पाहू शकता. पण इथे तुम्हाला हा सामना फुकटात पाहता येणार नाही. हॉटस्टारवर सामने फुकटात पाहता येत होते. पण जर तुम्हाला सोनी लिववर सामना पाहायचा असेल तर तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असणं गरजेचं आहे. तुम्ही भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह अपडेट्स http://www.loksatta.com वर मिळवू शकता.