India vs Pakistan Reserve Day Rain Prediction: यंदाच्या आशिया चषकात काही केल्या भारत विरुद्ध पाकिस्तान या बहुचर्चित सामन्याचा निकाल समोर येत नाहीये. सलग दुसऱ्यांदा, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामन्याच्या वेळी रविवारी कोलंबोमध्ये मुसळधार पावसामुळे व्यत्यय आला. कोलंबोतील प्रसिद्ध आर प्रेमदासा स्टेडियमवर पावसानी हजेरी लावली तेव्हा रोहित शर्माच्या भारताने २४.१ षटकात २ बाद १४७ धावा केल्या होत्या.

कोलंबो येथे नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित करणाऱ्या पाकिस्तानच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामीवीरांनी चांगली लय पकडली होती. भारतीय सलामीवीरांनी अर्धशतके झळकावत पहिल्या विकेटआधी १२१ धावा खात्यात जमा केल्या होत्या. सध्या के.एल. राहुल २८ चेंडूत १७ धावा आणि विराट कोहली १६ चेंडूत ८ धावा करत फलंदाजी करत आहे. तिसर्‍या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत ३८ चेंडूत २४ धावांची भागीदारी झाली आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान: राखीव दिवशी काय होणार? (IND vs PAK Reserve Day)

भारत विरुद्ध पाकिस्तान ‘सुपर ४’ सामना हा राखीव दिवस असलेला एकमेव आशिया चषक सामना आहे. प्रतिकूल हवामानामुळे रविवारी खेळ थांबवण्यात आला असल्याने सामना राखीव दिवशी (सोमवार) त्याच स्कोअरवर सुरू राहील. मात्र निकाल समोर येण्यासाठी दोन्ही गटांमध्ये किमान २० षटके पूर्ण होणे आवश्यक असेल.

मात्र समजा जर आजही, कोलोंबोमध्ये आजही पाऊस झाला आणि दोन्ही संघांमधील सुपर 4 सामना राखीव दिवशी वॉशआउट झाला तर भारत आणि पाकिस्तानचे मॅच पॉइंट्स शेअर होतील. मंगळवारी पाकिस्तानचा सामना संपल्यानंतर २४ तासांपेक्षा कमी कालावधीत रोहित व संघ पुढील सुपर फोर सामन्यात श्रीलंकेशी भिडतील.

हे ही वाचा << Asia Cup: “रोहित शर्माचा बॉडी डबल खेळतोय, शाहीन त्याला..”, शोएब अख्तरचं IND vs PAK आधी मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

११ सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात कोलोंबो येथे पावसाची शक्यता किती?

११ सप्टेंबर म्हणजेच आज सुद्धा कोलोंबोमध्ये हवामान फार आशादायक दिसत नाही. हवामानाचे अंदाज वर्तवणाऱ्या विविध वेबसाईट्सच्या माहितीनुसार आजही पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. AccuWeather ने आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून पावसाची ८० टक्के शक्यता वर्तवली आई तर. Weather.com वरील तासाभराच्या हवामान अंदाजानुसार, दुपारी ३ नंतर पावसाची ७० टक्के शक्यता आहे. टक्क्यांहून कमी होत नाही, सर्वाधिक पावसाची शक्यता ५:३० वाजता सुमारे ८२ % आहे तर सर्वात कमी (७२ %) संध्याकाळी ६.३० वाजता आहे