India Women’s Team Song Unveiled Video: भारतीय महिला संघ क्रिकेट संघ वर्ल्ड चॅम्पियन ठरला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने ५२ वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात आणत भारतीय महिला क्रिकेट इतिहासातील पहिला विश्वचषक पटकावला. यासह, महिला क्रिकेटला २५ वर्षांत प्रथमच एक नवीन विजेता मिळाला. यापूर्वी फक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनेच एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. आता या यादीत भारतीय संघ सामील झाला.
भारतीय संघातील खेळाडू एकच विश्वचषकाचा आनंद साजरा करताना दिसले. विश्वचषक विजयाचं सेलिब्रेशन करतानाचे अनेक व्हीडिओ, फोटो सध्या समोर येत आहेत. हरमनप्रीत कौर भांगडा करत ट्रॉफी घेण्यासाठी पोहोचली. तर जेमिमा रॉड्रीग्ज हरमनच्या वडिलांबरोबर भांगडा करत विजयाचा आनंज साजरा केला. यादरम्यान आता टीम इंडियाने भारतीय महिला संघाचं नवीन गाणं चाहत्यांबरोबर शेअर केलं आहे.
भारतीय महिला संघाने ४ वर्षांपूर्वी टीम साँग तयार केलं होतं, पण विश्वचषक जिंकल्यानंतरच हे संघाचं गाणं सर्वांबरोबर शेअर करायचं त्यांनी ठरवलं होतं. यासह आता विश्वचषक जिंकताच सर्वांनी हे गाणं म्हणतानाचा व्हीडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
संपूर्ण भारतीय संघ मैदानावर एकत्र गोल करून उभा आहे. ज्यामध्ये जेमिमा सुरूवातीला सांगतेय, “आम्ही ४ वर्षांपूर्वी हे ठरवलं होतं की जेव्हा आम्ही वर्ल्डकप जिंकू तेव्हा आम्ही हे संघाचं गाणं सर्वांबरोबर शेअर करू आणि आज तो दिवस आहे… चला सगळे तयार…”
भारतीय महिला संघाचे Team Song Lyrics
“टीम इंडिया, टीम इंडिया
करदे सबकी हवा टाईट
Till we rise here to fight
कोई ना लेगा हमको लाईट
ओ…. our future is brightसाथ मैं चलेंगे, साथ मैं उठेंगे
हम है टीम इंडिया हम साथ मैं जीतेंगे
ना लेना कोई पंगा, कर दे हम दंगा
रहेगा सबसे उपर हमारा तिरंगा…हम है टीम इंडिया, हम है टीम इंडिया”
