India Vs Australia Test Series : भारताला सलग दुसऱ्यांदा विश्व टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यात प्रवेश करायचा असेल, तर भारतीय खेळाडूंना काही महत्वाच्या गोष्टी कराव्या लागतील. गुरुवारी ९ मार्चला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. यासाठी भारतीय संघाचे खेळाडू नेट्समध्ये कंबर कसत आहेत. भारताने या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. पण डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात प्रेवश करण्यासाठी चौथ्या सामन्यात भारताला विजय संपादन करावं लागणार आहे. यासाठी भारतीय फलंदाजांना चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. रोहितच्या पलटणला ३-१ च्या फरकानं मालिकेवर कब्जा मिळवावा लागेल, जेणेकरुन श्रीलंके आणि न्यूझीलंड दौऱ्यावर डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना अवलंबून राहू नये.
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत फिरकीपटुंचा बोलबोला दिसला आहे. कारण खेळपट्टी फिरकीपटुंसाठी अनुकूल असल्याचं मागील झालेल्या अनेक सामन्यांत पाहायला मिळालं आहे. पण मोटेरा स्टेडियममध्ये फलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टी असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विराट कोहली आणि त्याचे सहकारी अप्रतिक कामगिरी करण्याचा प्रयत्न करताना दिसतील, यात मात्र शंका नाही. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारतीय संघाच्या चाहत्यांच भरभरून समर्थन मिळण्याची अपेक्षा आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी एक लाख प्रेक्षक पोहचण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अॅंथनी अल्बनीज या स्टेडियममध्ये क्रिकेटचा सामना पाहणार आहेत.
भारताचे दिग्गद फलंदाज विराट कोहली, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या फलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे. क्रिकेटच्या मैदानात या फलंदाजांना आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना धावांचा पाऊस पाडावा लागेल. जेणेकरून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना समाचार घेता येईल. कोहलीने मालिकेत आतापर्यंत १११ तर पुजाराने ९८ धावा केल्या आहेत. या दोघांनाही खेळपट्टीवर तग धरुन राहावं लागेल. भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या या मालिकेत सर्वाधिक धावा कर्णधार रोहित शर्माने (२०७) केल्या आहेत. त्यानंतर अक्षर पटेलने (१८५) धावा कुटल्या आहेत.
यानुसार असं लक्षात येतं की, फलंदाजांसाठी बीजीटी २०२३ मध्ये धावांचा डोंगर रचणे किती अवघड बनलं आहे. फलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवर नेथन लायन, टॉड मर्फी आणि मॅट कुहमैन यांच्याशी लढत करणे म्हणजे भारताने पहिल्यांदा फलंदाजी केल्यास तशाप्रकारची खेळपट्टी मिळणार नाही. जिथे पहिल्या पाच मिनिटांतच चेंडू फिरणं सुरु होतं. कोहली आणि पुजारा या गोष्टी चांगल्या पद्धतीने समजतात. दिर्घकाळापासून त्यांनी अशा गोलंदाजीसमोर मोठी खेळी साकारली नाहीय. जर फलंदाजीसाठी ही खेळपट्टी अनुकूल असेल तर त्यांना चमकदार कामगिरी करता येऊ शकते.