scorecardresearch

धोनीसारखाच ‘हा’ खेळाडू रेल्वेत करत होता नोकरी; IPL मध्ये एन्ट्री मारताच बनला करोडपती

know About Indian Premier League Interesting Facts : रेल्वेत १७ हजारांची नोकरी करणारा ‘हा’ खेळाडू रातोरात बनला करोडपती, वाचा सविस्तर माहिती.

Karn Sharma Became Rich Player In IPL
रेल्वेत नोकरी करणारा हा खेळाडू IPL मध्ये बनला करोडपती. (Image-Indian Express)

Indian Premier League Interesting Facts : आयपीएल एक असा मंच आहे, जिथे युवा खेळाडू त्यांचं कौशल्य दाखवतात आणि आख्ख्या जगात नावलौकीक करतात. आयपीएलच्या माध्यमातून अनेक खेळाडूंचं भाग्य उजळलं आहे. यावेळी आयपीएलच्या लिलावात अनेक खेळाडू करोडपती बनले. आज आम्ही तुम्हाला अशाच एका भारतीय खेळाडूबाबत सांगणार आहोत, जो धोनीसारखाच रेल्वेत नोकरी करत होता. हा खेळाडू आयपीएलचा किताब चारवेळा जिंकला आहे.

रेल्वेत केली नोकरी अन् IPL मध्ये बनला करोडपती

आरसीबीने आयपीएल मेगा ऑक्शन २०२२ मध्ये फिरकीपटू कर्ण शर्माचा त्यांच्या संघात समावेश केला होता. भेदक गोलंदाज म्हणून कर्ण शर्माने क्रिकेटच्या मैदानात छाप टाकली आहे. कर्ण शर्माच्या जीवनाबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. धोनीप्रमाणेच कर्णही रेल्वेत नोकरी करत होता. कर्णला बालपणापासूनच क्रिकेट खेळायची आवड होती. कौंटुबिक परिस्थिती पाहून कर्णने २००५ मध्ये रेल्वेत फोर्थ ग्रेडची नोकरी केली. कर्ण रेल्वे रुळाची दुरुस्ती करणे आणि लोखंडी रॉड उचलण्याचं काम करत होता. परंतु, २०१४ मध्ये कर्णचं नशिब अचानक पालटलं. २०१४ मध्ये झालेल्या आयपीएल सीजन ७ मध्ये हैद्राबाद संघाने त्याला ३.७५ कोटी रुपयांत खरेदी केलं आणि कर्ण लागलीच करोडपती बनला.

नक्की वाचा – IPL मध्ये ‘या’ तीन दिग्गज खेळाडूंनी एकही षटकार ठोकला नाही; नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क

कर्ण शर्माचा आंतरराष्ट्रीय करिअर

कर्णने २००७ मध्ये रेल्वे रणजी संघातून क्रिकेटच्या करिअरला सुरुवात केली होती. कर्णने सप्टेंबर २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय करिअरला सुरवात केली. त्याचवर्षी डिसेंबरमध्ये कर्णला श्रीलंकाविरुद्ध वनडे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. कर्णने भारतासाठी एकूण चार सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला पाच विकेट्स मिळाले आहेत. कर्णने आयपीएलमध्ये आतापर्यंत ६८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर ७.९१ च्या इकोनॉमी रेटने ५९ विकेट मिळाले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 19:39 IST

संबंधित बातम्या