भारताने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कतारचा ३-१ असा सहज पराभव केला, तर महिलांमध्ये भारताने नेदरलँड्स संघावर ३.५-०.५ अशी मात करत शानदार कामगिरी केली.
पुरुष गटात भारताच्या एस. पी. सेतुरामनने कतारच्या मोहम्मद अल सईदला हरविले तर कृष्णन शशीकिरणने झुई चेनवर मात केली. परिमार्जन नेगीला मात्र मोहम्मद अल मोदिहकीने बरोबरीत रोखले. चौथ्या पटावर बी. अधिबनही नेझाद हुसेन अझाझविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली.
महिलांमध्ये भारताने नेदरलँड्सवर सहज विजय मिळवला. तानिया सचदेवने अ‍ॅनी हास्टवर मात केली तर मेरी अ‍ॅन गोम्सने बियान्का मुहरीनला हरविले. द्रोणावली हरिकाला पेंग झाओक्विनविरुद्धचा डाव बरोबरीत ठेवावा लागला. शेवटच्या लढतीत पद्मिनी राऊतने तिआ लँचाव्हावर एकतर्फी विजय मिळविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian teams notch impressive wins in chess olympiad
First published on: 11-08-2014 at 12:18 IST