दुबई  : भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड (२०१६) आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (२०१७) झालेले सामने निश्चित होते, हा ‘अल जझीरा’ या वृत्तवाहिनीने केलेला दावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) फेटाळून लावला आहे. यापैकी कोणतेही सामने निश्चित केलेले नव्हते. ‘अल जझीरा’ने केलेला दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असे ‘आयसीसी’ने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अल जझीरा’ने एका लघुपटात भारत आणि इंग्लंड यांच्यात २०१६ साली चेन्नई येथे खेळवला गेलेला तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१७ साली रांची येथे खेळवला गेलेला सामना निश्चित करण्यात आला होता, असे म्हटले आहे. या लघुपटात आरोप केलेल्या पाच व्यक्तींनी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. या वाहिनीला कोणतेही सबळ पुरावे देता आले नाहीत, असेही ‘आयसीसी’ने म्हटले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias test matches against england australia were not fixed icc zws
First published on: 18-05-2021 at 01:47 IST