भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी पार पडला. यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अतिशय खराब सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने पहिल्या टी-२० सामन्यात भारतावर ९ गडी राखून एकतर्फी विजय नोंदवला. बेथ मुनीच्या धडाकेबाज फलंदाजीसमोर भारतीय गोलंदाज पूर्णपणे बॅकफूटवर दिसत होते. यामुळेच अष्टपैलू कामगिरी करूनही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून, भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. ऋचा घोष आणि दीप्ती शर्मा यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना, बेथ मुनीच्या ५७ चेंडूत ८९ धावांच्या खेळी केली. ज्यामुळे पाहुण्या संघाने ११ चेंडू बाकी असताना सामना जिंकला. मुनीने आपल्या १६ चौकार लगावले.

भारताकडून शेफाली वर्माने १० चेंडूत २१ धावांची धडाकेबाज खेळी केली. स्मृती मंधानानेही २२ चेंडूत २८ धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जला तिचे खातेही उघडता आले नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या बॅटमधून २३ चेंडूत २१ धावांची संथ पण महत्त्वाची खेळी आली. मधल्या फळीत दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष यांनी तुफानी फलंदाजी केली. दीप्तीने अखेर २४० च्या स्ट्राईक रेटने १५ चेंडूत नाबाद ३६ धावा फठकावल्या. रिचानेही याच धर्तीवर २० चेंडूत ३५ धावा फटकावल्या. देविकाने २४ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या.

हेही वाचा – IND vs BAN 3rd ODI: बांगलादेश व्हाईट वॉश देण्यास सज्ज; टीम इंडियासमोर आज प्रतिष्ठा जपण्याचे आव्हान

लक्ष्याचा पाठलाग करताना, बेथ मुनी आणि यष्टिरक्षक फलंदाज अॅलिसा हिली यांनी पहिल्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. हीलीने २३ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. नवव्या षटकात देविकाने हीलीला हरमनप्रीत कौरवी झेलबाद केले. यानंतर ताहलिया मॅकग्रा ४०(२९) ने शेवटपर्यंत फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indw vs ausw 1st t20 australia women team beat india women team by 9 wickets vbm
First published on: 10-12-2022 at 10:21 IST