Women’s T20 World Cup 2023 Semifinal: आयसीसी महिला टी-२० विश्वचषकात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजता सुरू होईल. भारतीय संघाने ब गटात दुसरे स्थान मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने ‘अ’ गटातील त्यांचे सर्व सामने जिंकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपांत्य फेरीच्या सामन्यात केपटाऊनमधील हवामानाकडेही चाहत्यांची नजर असेल. तुम्हाला आठवत असेल की भारतीय संघ त्यांच्या शेवटच्या सामन्यात आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरला तेव्हा पाऊस पडला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार निर्णय झाला. यावेळी चांगली गोष्ट म्हणजे हवामान अहवालानुसार, केपटाऊनमध्ये पावसाची फारशी शक्यता नाही. क्रिकेटसाठी योग्य परिस्थिती असून संपूर्ण सामना पाहता येणार आहे.

सामना पावसामुळे वाया गेल्यास काय असेल निर्णय?

या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाऊस पडला आणि निकाल मिळविण्यासाठी किमान षटके टाकली गेली नाहीत, तर काळजी करण्याचे कारण नाही. कारण आयसीसीने उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. म्हणजेच पावसामुळे किंवा अन्य कारणामुळे २३ फेब्रुवारीला सामना होऊ शकला नाही, तर दुसऱ्या दिवशी २४ फेब्रुवारीला सामना जिथे थांबला होता तिथून सुरू होईल.

हेही वाचा – IND vs AUS ODI Series: ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर; मॅक्सवेलसह ‘या’ धडाकेबाज खेळाडूंचे झाले पुनरागमन

पहिल्या आणि राखीव अशा दोन्ही दिवशी सामना झाला नाही. म्हणजेच नाणेफेक न करता किंवा एकही षटक न खेळता पावसामुळे सामना रद्द झाला, तर गट टप्प्यातील गुणतालिकेच्या आधारे निर्णय घेतला जाईल. अशा परिस्थितीत, ऑस्ट्रेलियन संघ अंतिम फेरीत पोहोचेल. कारण ते आपल्या गट-अ मध्ये अव्वल स्थानावर राहिला आहे.

येथील खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल –

न्यूलँड्स क्रिकेट मैदानाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते. अशा परिस्थितीत या ब्लॉकबस्टर सामन्यात दोन्ही बाजूंच्या वेगवान गोलंदाजांची मोठी भूमिका असेल. यासोबतच फलंदाजांनाही या विकेटवर स्वत:ला सांभाळून खेळावे लागेल आणि सुरुवातीच्या स्पेलमध्ये बाद होण्याचे टाळावे लागेल. एकदा फलंदाज सेट झाल्यानंतर ते मुक्तपणे धावा करू शकतील.

हेही वाचा – Team India: सिराज संघातून ड्रॉप होणार होता, पण विराटच्या ‘त्या’ निर्णयाने बदलले आयुष्य; Dinesh Karthikचा मोठा खुलासा

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

भारत: स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग ठाकूर.

ऑस्ट्रेलिया: मेग लॅनिंग (कर्णधार), बेथ मुनी, अलिसा हिली, अलिसा पेरी, ऍशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, एलाना किंग, मेगन शुट, डी’आर्सी ब्राउन.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indw vs ausw semi final washed away by rain so who will get entry in the final vbm
First published on: 23-02-2023 at 14:54 IST