ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या अंगठय़ाला बुधवारी सराव करताना दुखापत झाली. त्यामुळे भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेला वॉर्नरला मुकावे लागणार आहे.
भारत दौऱ्यावर होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा गुरुवारी पर्थ येथे करण्यात येणार आहे. चेन्नई, हैदराबाद, मोहाली आणि नवी दिल्ली या ठिकाणी हे कसोटी सामने होणार आहेत.
निवड समितीच्या बैठकीच्या आदल्या दिवशी ‘वाका’ स्टेडियमवर सराव करताना मिचेल जॉन्सनचा चेंडू लागल्यामुळे वॉर्नरला दुखापत झाली. भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.