एपी, दोहा : प्रथमच उन्हाळय़ाऐवजी हिवाळय़ात आणि फुटबॉल हंगामाच्या मध्येच आयोजित करण्यात आलेल्या ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेपूर्वी व स्पर्धेदरम्यान खेळाडूंना दुखापती होण्याची भीती वर्तवण्यात येत होती. ही भीती दिवसागणिक खरी होताना दिसते आहे. विविध देशांच्या काही आघाडीच्या खेळाडूंना दुखापतींमुळे यंदाच्या विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. शुक्रवारी सेनेगल आणि अर्जेटिना या संघांनाही धक्के बसले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेनेगलचा तारांकित आघाडीपटू सादिओ माने रविवारपासून सुरू होणाऱ्या ‘फिफा’ विश्वचषकात खेळू शकणार नाही. माने याच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जर्मनीतील फुटबॉल क्लब बायर्न म्युनिककडून खेळताना ८ नोव्हेंबरला मानेच्या पायाला दुखापत झाली होती. मात्र, ‘फिफा’ विश्वचषकातील काही सामन्यांत तो सहभाग नोंदवेल अशी आशा असल्याने त्याचा सेनेगलच्या संघात समावेश करण्यात आला होता. परंतु त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याच्यावर ऑस्ट्रिया येथे शस्त्रक्रिया करण्यात आली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Injuries continues senegal mane argentina gonzales korea miss fifa world cup ysh
First published on: 19-11-2022 at 00:02 IST