कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर काल रविवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात धिम्या गतीने गोलंदाजी केल्याचा फटका मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहीत शर्माला बसलाय. रोहीतवर २०,००० डॉलर्सचा दंड आकारण्यात आला आहे. आयपीएल कोड ऑफ कंडक्टच्या पहील्या पातळीवरील नियमांनुसार सामन्यात धिम्या गतीने गोलंदाजी केल्यास २०,००० डॉलर्सचा दंड संघाच्या फलंदाजाला भरावा लागतो. ” निर्धारीत वेळेत अपेक्षित षटके पूर्ण होण्यापेक्षा मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजीची गती तीन षटके मागे असल्याचे सामना संपल्यानंतर लक्षात आले त्यामुळे मुंबई संघाचा कर्णधार रोहीत शर्माला दंड भरावा लागणार आहे” असे आयपीएलच्या व्यवस्थापनाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th May 2013 रोजी प्रकाशित
आयपीएल २०१३: रोहीत शर्माला दंड
कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर काल रविवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात धिम्या गतीने गोलंदाजी केल्याचा फटका मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहीत शर्माला बसलाय. रोहीतवर २०,००० डॉलर्सचा दंड आकारण्यात आला आहे.
First published on: 27-05-2013 at 03:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2013 rohit sharma fined for slow over rate