आजची मॅच काही महत्त्वाची नव्हती. कारण राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स हे दोन्ही संघ काही प्ले आॅफमध्ये जाणार नव्हते. ही मॅच कोणतीही टीम जिंकली असती तरी ती टीम प्ले आॅफमध्ये जाण्याचे चान्सेस शून्य होते. पण तरीही आयपीएलमध्ये सपाटून मार खाणाऱ्या या दोन्ही टीम्सना आयपीएलच्या या सीझनचा शेवट विजयाच्या स्मृतींनी करायचा होता. पण तसा खेळही आवश्यक होता. आणि यातच राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू यशस्वी ठरलं. त्यांनी टाॅस जिंकत पहिली बॅटिंग करायचा निर्णय घेतला खरा. पण त्यानंतर दिल्लीच्या बाॅलर्सनी त्यांनाव चांगलंच रोखून ठेवलं. तरीही ख्रिस गेल आणि विराट कोहलीच्या फटकेबाजीमुळे त्यांना चांगली धावसंख्या रचता आली. विराट कोहलीने अर्धशतक झळकावत ५८ रन्स केल्या तर ख्रिस गेलचं अर्धशतक दोन रन्सने हुकलं. गेल ने ४८ रन्स केल्या. राॅयस चॅलेंजर्सनी ६ विकेट्सच्या मोबदल्यात १६१ रन्सची धावसंख्या उभारली.
प्रत्त्युत्तरादाखल मेैदानात उतरलेल्या दिल्लीला त्यांच्या इनिंग्जच्या सुरूवातीलाच हादरा बसला. संजू सॅमसन मॅचच्या दुसऱ्याच बाॅलला विराट कोहलीकडे कॅच देत परतला. पण त्याच्यानंतर करूण नायर आणि श्रेयस अय्यरने चांगल्या भागीदारीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा जाव सावरला. पण त्यानंतर ठराविक अंतराने दिल्लीच्या विकेट्स पडत गेल्या आणि दिल्लीचा पराभव झाला.