करोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. लाखो लोक करोना व्हायरसच्या विळख्यात आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतात धर्म मानल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धादेखील काही काळ स्थगित करण्यात आल्या असून IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आणि सावधनता बाळगण्याचा सल्ला देत आहेत. IPL लांबणीवर पडल्याने क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला आहे, पण गेल्या वर्षी मात्र आजच्या दिवशी क्रिकेटप्रेमींना रसलच्या वादळी खेळी आस्वाद घेता आला होता.

सर्वोत्तम आजी-माजी फलंदाज कोण? वॉर्नर-विल्यमसन यांनी दिलं उत्तर

२८ एप्रिल, २०१९ ला कोलकाताच्या मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबईला कोलकाताकडून ३४ धावांनी हार पत्करावी लागली होती. रसलच्या नाबाद ८० धावांच्या जोरावर कोलकाताने मुंबईपुढे २३३ धावांचे महाकाय लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने प्रयत्नांची शर्थ करत ९१ धावांची खेळी केली होती, पण त्याची झुंज अपयशी ठरली होती.

पाकिस्तानी क्रिकेटपटूला दणका! मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली तीन वर्षांची बंदी

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या कोलकात्याच्या फलंदाजांनी मुंबईवर पूर्णपणे वर्चस्व मिळवले होते. शुभमन गिलने ४५ चेंडूत ७६ धावांची खेळी करत आपली उपयुक्तता दाखवून दिली होती. आंद्रे रसलच्या साथीने त्याने फटकेबाजी केली होती. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर गिल माघारी परतल्यानंतर कार्तिकच्या साथीने रसेलने आपलं अर्धशतक साजरं केलं होतं. रसलने ४० चेंडूत नाबाद ८० धावा ठोकल्या. रसलच्या खेळीत ६ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह यासारख्या जगात सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या गोलंदाजांची त्याने धुलाई केली होती. मुंबईकडून हार्दिक पांड्या आणि राहुल चहरने १-१ बळी घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कारण तर दिलं नाही, फक्त ‘प्रयत्न कर’ असं सांगतं बसले”; माजी भारतीय क्रिकेटपटूचा आरोप

२३३ धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक स्वस्तात झेलबाद झाला. पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माही पायचीत झाला. त्यानंतर डावखुरा फलंदाज एवीन लुईस याने फटकेबाजीचा प्रयत्न केला, पण तो पण माघारी परतला. केवळ हार्दिक पांड्याने तुफान फटकेबाजी केली. त्याने ३४ चेंडूत ९१ धावा केल्या. यात ६ चौकार आणि ९ षटकार यांचा समावेश होता. पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.