IPL 2019 RCB vs SRH Live Updates : IPL २०१९ मध्ये सर्वात जास्त पराभव पाहिलेल्या बंगळुरूने हंगामाचा अखेर विजयाने केला. शिमरॉन हेटमायर (७५) आणि गुरकीरत सिंग (६५) यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर बंगळुरूने हैदराबादला ४ गडी आणि ४ चेंडू राखून पराभूत केले. या पराभवामुळे हैदराबादची प्ले ऑफ्स फेरीत पोहोचण्याची वाट बिकट झाली असून त्यांना रविवारच्या २ सामन्यांच्या निकालाची वाट पहावी लागणार आहे.
.@RCBTweets win by 4 wickets and sign off their #VIVOIPL campaign on a high#RCBvSRH pic.twitter.com/uD0rmxiL1C
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2019
१७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरुवात अतिशय खराब झाली. पार्थिव पटेल शून्यावर माघारी परतला. विराट कोहलीने धडाकेबाज सुरुवात केली होती, पण खलील अहमदने उत्तम चेंडू टाकून त्याला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले. कोहलीने २ चौकार आणि १ षटकार लगावला. कोहली पाठोपाठ डिव्हिलियर्सदेखील लगेचच झेलबाद झाला. त्याने केवळ १ धाव केली. विंडीजचा तडाखेबंद फलंदाज शिमरॉन हेटमायर याला अखेरच्या साखळी सामन्यात सूर गवसला. ३ बाद २० या धावसंख्येवरुन डाव पुढे नेताना हेटमायरने पहिले IPL अर्धशतक ठोकले. गुरकीरत सिंगने संयमी खेळी करत अप्रतिम अर्धशतक ठोकले. याचबरोबर त्याने शिमरॉन हेटमायरसोबत शतकी भागीदारीही केली. पण अंतिम टप्प्यात फटकेबाजी करताना हेटमायर ७५ धावा काढून बाद झाला. पाठोपाठ गुरकिरतही ६५ धावांवर बाद झाला. पण अखेर शेवटच्या षटकात २ चौकार खेचत उमेश यादवने बंगळुरूला विजय मिळवून दिला.
100-run partnership between Hetmyer and Gurkeerat pic.twitter.com/nAJhdV4bB9
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2019
त्याआधी नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या बंगळुरुच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या धावगतीवर चांगलाच अंकुश लावला. वृद्धीमान साहा (२०) आणि मार्टीन गप्टील (३०) जोडीने पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र साहा माघारी परतल्यानंतर हैदराबादचे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. मात्र चौथ्या विकेटसाठी केन विल्यमसन आणि विजय शंकर यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली. शंकर (२७) माघारी परतल्यानंतर हैदराबादच्या डावाला पुन्हा गळती लागली. एकीकडे फलंदाज माघारी परतत असताना कर्णधार केन विल्यमसनने संयमी खेळी करत अर्धशतक झळकावलं. त्याने नाबाद ७० धावा केल्या.
बंगळुरुकडून वॉशिंग्टन सुंदरने ३, नवदीप सैनीने २ तर युजवेंद्र चहल आणि कुलवंत खेजरोलिया यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
बंगळुरूने हैदराबादला ४ गडी आणि ४ चेंडू राखून पराभूत केले. या पराभवामुळे हैदराबादची प्ले ऑफ्स फेरीत पोहोचण्याची वाट बिकट झाली असून त्यांना उद्याच्या २ सामन्यांच्या निकालाची वाट पहावी लागणार आहे.
बंगळुरूच्या डावाला गळती; सामना रंगतदार स्थितीत
शतकी भागीदारी केल्यानंतर बंगळुरूच्या विजय दृष्टीपथात आला असे वाटत असतानाच हैदराबादने झटपट बळी टिपून संघात पुनरागमन केले. आधी हेटमायर मोठा फटका खेळताना बाद झाला. त्याने ४७ चेंडूत ७५ धावा केल्या. पाठोपाठ गुरकीरतदेखील ६५ धावांवर बाद झाला.
गुरकीरत सिंगने संयमी खेळी करत अप्रतिम अर्धशतक ठोकले. याचबरोबर त्याने शिमरॉन हेटमायरसोबत शतकी भागीदारीही केली.
विंडीजचा तडाखेबंद फलंदाज शिमरॉन हेटमायर याला अखेरच्या साखळी सामन्यात सूर गवसला. ३ बाद २० या धावसंख्येवरुन डाव पुढे नेताना हेटमायरने पहिले IPL अर्धशतक ठोकले.
कोहली पाठोपाठ डिव्हिलियर्सदेखील लगेचच झेलबाद झाला. त्याने केवळ १ धाव केली. त्यामुळे बंगळुरूची अवस्था ३ बाद २० अशी झाली होती.
विराट कोहलीने धडाकेबाज सुरुवात केली होती, पण खलील अहमदने उत्तम चेंडू टाकून त्याला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले. कोहलीने २ चौकार आणि १ षटकार लगावला.
१७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरुवात अतिशय खराब झाली. पार्थिव पटेल शून्यावर माघारी परतला.
हैदराबादची १७५ धावांपर्यंत मजल
बंगळुरुला विजयासाठी १७६ धावांचं आव्हान
कुलवंत खेजरोलियाने घेतला बळी
नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर गुरकिरत मान सिंहने घेतला झेल
युजवेंद्र चहलने घेतला बळी
वॉशिंग्टन सुंदरने घेतला बळी
ठराविक अंतराने मार्टीन गप्टील आणि मनिष पांडे माघारी
हैदाराबादचे ३ गडी बाद
नवदीप सैनीने घेतला बळी
बाद फेरीसाठी हैदराबादला आजच्या सामन्यात विजय आवश्यक