ईडन गार्डन्स आणि रोहित शर्माचं हे अनोखं नातं माहिती आहे का?

कर्णधार या नात्याने रोहित शर्माचा शंभरावा सामना

आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आणखी एक विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. रविवारी ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईड रायडर्स संघाविरुद्धचा सामना रोहितचा कर्णधार म्हणून शंभरावा सामना ठरला आहे. ईडन गार्डन्स मैदानावर रोहित शर्माची कामगिरी ही नेहमीच चांगली राहिलेली आहे. आजच्या सामन्यानंतर रोहित शर्मा आणि ईडन गार्डन्स मैदानाचं नात अधिकच दृढ झालं आहे.

२००८ साली आयपीएलच्या पहिल्या हंगामात याच मैदानावर रोहितने पदार्पण केलं होतं. यानंतर आयपीएलमधलं पहिलं शतक, कर्णधार म्हणून पदार्पण, पहिलं आयपीएल विजेतेपद अशा अनेक महत्वाच्या घटना रोहितने ईडन गार्डन्स मैदानाच्या साथीने अनुभवल्या आहेत. त्यामुळे कोलकात्याविरुद्ध सामन्यात रोहित कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ipl 2019 rohit sharma 100th game as a captain know his special connection with eden gardens