आयपीएल २०२१ मध्ये रविवारी पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शेवटच्या चेंडूवर दोन गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात रवींद्र जडेजाने उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करत चार षटकांत फक्त २१ धावा देऊन एक विकेट घेतली आणि नंतर ८ चेंडूत २२ धावांची शानदार खेळी खेळली, जी सामना जिंकणारी खेळी ठरली. १७.३ षटकांत चेन्नईने १४२ धावांत सहा गडी गमावले होते, पण १९ व्या षटकात जडेजाने चेन्नईचा विजय खेचून आणला. या सामन्यामध्ये रविंद्र जडेजाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. मात्र यानंतर जडेजाने केलेल्या कृतीमुळे सर्वांचीच मने जिंकली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविंद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी जिंकली आणि ती आपल्या मुलीला समर्पित केली आहे. सामन्यानंतर, जडेजाने त्याच्या इन्टा अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. ‘हे तुझ्यासाठी आहे निध्याना, हॅप्पी डॉटर्स डे.’ या कॅप्शनसह जडेजाने मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचा फोटो शेअर केला आहे.

प्रसिद्ध कृष्णाने केकेआरसाठी १९ वे षटक टाकले. त्यावेळी पहिल्या चेंडूवर जडेजाने एकच धाव काढली. त्यानंतर सॅम करणने एक धाव काढली. मात्र पुढच्या चार चेंडूंमध्ये जडेजाने काय करणार याचा कोणालाही अंदाज आला नव्हता. जडेजाने आधी सलग दोन षटकार आणि नंतर सलग दोन चौकार मारले. अशाप्रकारे, चेन्नईला शेवटच्या षटकात १२ चेंडूत २६ धावांची गरज असताना जडेजाने दमदार कामगिरी केली.

सुनील नरेनने सॅम करण आणि जडेजाला शेवटच्या षटकात बाद करून सामना अधिक रोमांचक बनवला, पण शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर यांनी मिळून संघाला विजय मिळवून दिला. केकेआरने २० षटकांत ६ बाद १७१ धावा केल्या, प्रत्युत्तरात चेन्नईने २० षटकांत ८ बाद १७२ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 csk vs kkr ravindra jadeja dedicated man of the match award daughter abn
First published on: 27-09-2021 at 08:34 IST