Shubman explains the reason for Gujarat’s defeat : बुधवारी झालेल्या आयपीएल २०२४ च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा ४ धावांनी पराभव केला. यासह गुजरात टायटन्सला हंगामातील पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आता गुजरात टायटन्स संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरला आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्स संघ आता गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्याच्या आशा कायम आहेत. दरम्यान या सामन्यातील पराभवावर गुजरातचा कर्णधार शुबमन गिलने प्रतिक्रिया दिली.

पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल संतापला –

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने संतापला. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल या पराभवानंतर म्हणाला, “मला वाटते की आम्ही खरोखर चांगले क्रिकेट खेळलो. सरतेशेवटी पराभूत होणे निराशाजनक आहे, परंतु सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. आम्ही शेवटपर्यंत चमकदारपणे लढलो आणि आम्ही कधीही सामन्यातून बाहेर पडू, असे कधीच वाटले नव्हते.”

Ravindra jadeja Lifts Rahul Dravid After Wins Best Fielder Medal
IND v AFG: भारताच्या विजयानंतर जडेजाने ड्रेसिंग रूममध्ये राहुल द्रविडला थेट उचलून घेतलं, पण नेमकं घडलं तरी काय? पाहा VIDEO
Rohit Sharma Statement on India Win and Playing XI
IND v AFG: भारताच्या विजयानंतर प्लेईंग इलेव्हनवर रोहित शर्माचे मोठे वक्तव्य, म्हणाला; भविष्यातील सामन्यांमध्ये तीन गोलंदाज….
Disappointment of Pakistani fan who sold tractor video viral
IND vs PAK सामना पाहण्यासाठी पाकिस्तानच्या चाहत्याने विकला ट्रॅक्टर, भावुक होत सांगितली व्यथा, VIDEO व्हायरल
IND vs PAK Highlights Match Score Updates in Marathi T20 World Cup 2024
India Won Against Pakistan Highlights: न्यूयॉर्कमध्येही भारताचा पाकिस्तानवर डंका! ऋषभ पंत, जसप्रीत बुमराहने उमटवली छाप
Gurbaz Zadran's century partnership record in T20 World Cup
AFG vs NZ : अफगाणिस्तानच्या सलामी फलंदाजांनी १० वर्ष जुन्या विक्रमाची केली पुनरावृत्ती, विराट-रोहितशी साधली बरोबरी
USA beat Pakistan in super overs in T20 world cup 2024
USA vs PAK : ‘भूख लगी थी इसलिए अंडा बना दिया…’, पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूला भोपळाही फोडता न आल्याने चाहत्यांनी उडवली खिल्ली
Uganda team dance video after victory
T20 WC 2024 : युगांडा संघाने पापुआ न्यू गिनीवर विजय मिळवल्यानंतर केला भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल
Rohit Sharma Injured in IND vs IRE Match Got Retired Hurt After Smashing Half Century
T20 WC 2024: भारताला विजयानंतरही बसला धक्का, रोहित शर्माला सामन्यात दुखापत; रिटायर्ड हर्ट होत माघारी परतला

मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअरची मोठी भूमिका –

शुबमन गिल म्हणाला, “जेव्हा तुम्ही २२४ धावांचा पाठलाग करत असाल, तेव्हा योजनांबद्दल बोलण्यात काही अर्थ नसतो. कारण त्यावेळी तुम्हाला फक्त फक्त धावा करायच्या असतात. मला वाटते की मोठ्या धावसंख्येच्या सामन्यांमध्ये इम्पॅक्ट प्लेअर मोठी भूमिका बजावतात. तुम्ही विकेट गमावल्या तरीही फलंदाजांना पुढे जाण्यासाठी अतिरिक्त पाठिंबा मिळतो. त्यामुळे फलंदाजांना आक्रमकपणे धावा काढण्याची मोकळीक मिळते.”

हेही वाचा – DC vs GT : ट्रिस्टन स्टब्सच्या सीमारेषेवरील शानदार फिल्डिंगने सामन्याला दिली कलाटणी, VIDEO व्हायरल

पराभवासाठी अप्रत्यक्षपणे मोहितला धरले जबाबदार –

गुजरात टायटन्सचा कर्णधार पुढे म्हणाला, “एकेकाळी आम्हाला वाटले होते की आम्ही दिल्ली कॅपिटल्सला २००-२१० धावांपर्यंत रोखू शकतो, पण आम्ही शेवटच्या २-३ षटकांमध्ये काही अतिरिक्त धावा दिल्या.” या वक्तव्याने शुबमन गिलने अप्रत्यक्षपणे मोहित शर्माला जबाबदार धरले आहे. कारण या सामन्यातील शेवटचे षटक मोहित शर्माने टाकले होते आणि ३१ धावा दिल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मोहित शर्माने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये एकही विकेट न घेता ७३ धावा दिल्या. यासह मोहित शर्माने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज ठरला.

हेही वाचा – DC vs GT : रसिख सलाम दारला ‘ती’ चूक पडली महागात, बीसीसीआयने वेगवान गोलंदाजाला फटकारले

दिल्लीचे मैदान लहान होते –

शुबमन गिल पुढे म्हणाला, “हे एक छोटे मैदान होते, जेव्हा आम्ही लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बाहेर पडलो, तेव्हा आम्ही याबद्दल चर्चा केली होती. पंरतु मैदानावर तुमची योजना योग्य रीतीने अंमलात आणणे खूप महत्त्वाचे ठरते. जर तुमच्याकडे क्रिझवर सेट फलंदाज किंवा फिनिशर असेल तर तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. जर खेळपट्टीत काही असेल तर ते ठीक आहे, परंतु अशा खेळपट्ट्यांवर आपण आपल्या सर्व योजना अचूकपणे अंमलात आणल्या आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे. मग ते यॉर्कर्स असो किंवा इतर कोणतीही गोलंदाजी असो.”