जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आयपीएलच्या १४व्या हंगामाच्या यूएई स्टेजमध्ये चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे प्रेक्षक स्टेडियममध्ये त्यांच्या आवडत्या संघांना आणि आवडत्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. काही वेळेस हेच प्रेक्षक आपल्या विविध कृतीमुळे लक्ष वेधून घेतात. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यातही एका चाहत्याने लक्ष वेधून घेतले. हा चाहता सोशल मीडियावरही व्हायरल झाला.

हा चाहता स्टेडियममध्ये एक प्लकार्ड घेऊन आला होता. या प्लकार्डवर ”माझी पत्नी मला चेन्नई सुपर किंग्जची जर्सी घालू देत नाही”, असे लिहिले होते. या चाहत्याचा फोटो चेन्नई सुपर किंग्जच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हे फलक दाखवताना त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची जर्सी घातली होती. या फोटोला १७ हजारांहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे. चेन्नई सुपर किंग्जने या फोटोला ‘प्रेम आंधळे असते’ असे कॅप्शन दिले आहे.

ipl 2024 lsg vs csk match noise levels peak as ms dhoni walks out to bat in lucknow ekana stadium quinton de kock wife shares photo
धोनीच्या एन्ट्रीनंतरचा स्टेडियममधील ‘तो’ माहोल प्रेक्षकांसाठी ठरू शकतो घातक! क्विंटन डिकॉकच्या पत्नीने पोस्ट केला PHOTO
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Paris Olympics Opening ceremony faces major changes
ऑलिम्पिक सोहळा पुन्हा स्टेडियममध्ये? सुरक्षेचा धोका असल्याची फ्रान्सच्या अध्यक्षांना भीती
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा

२०२० च्या पर्वात वाईट कामगिरी करणारा चेन्नईचा संघ यंदा मात्र प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ ठरण्याची शक्यता आहे. चेन्नईचा प्लेऑफमधील प्रवेश जवळजवळ निश्चित झाला असून ८ विजय मिळवून १६ गुणांसहीत चेन्नई अव्वल स्थानी आहे. आता चेन्नई उर्वरित सर्व सामन्यांमध्ये पराभूत झाला तरी चौथ्या स्थानावर राहणारा संघ ठरणार आहे. त्यामुळे त्याचे प्लेऑफचं तिकीट जवळपास निश्चित झाले आहे.

हेही वाचा – IPL 2021 : KKRला ‘जबर’ धक्का! संघ चांगली कामगिरी करत असताना ‘स्टार’ खेळाडू भारतात परतला

रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. कोलकात्याने चेन्नईला विजयासाठी ७ गडी गमवून विजयासाठी १७२ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान चेन्नईने ८ गडी गमावून पूर्ण केले. शेवटच्या षटकांत आक्रमक खेळी करत रवींद्र जडेजाने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. जडेजाने ८ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २२ धावा केल्या.