आयपीएल २०२१ स्पर्धा आता अंतिम टप्प्यावर आली आहे. आज या लीगचा ४८वा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघात रंगत आहे. बंगळुरूचा कप्तान विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय केला. बंगळुरुचे सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी संघासाठी उत्तम सुरुवात केली. पण एका घटनेने सर्वांचे लक्ष या सामन्याकडे वेधले गेले. पंजाबचा कप्तान केएल राहुल पंचाशी वाद घालताना दिसून आला.

त्याचे झाले असे, की पंजाबकडूम आठवे षटक फिरकीपटू रवी बिश्नोई टाकत होता. या षटकातील चौथ्या तिसऱ्या चेंडूवर पडिक्कलचा यष्टीपाठी झेल घेतल्याचे अपील राहुलने केले. पंचांनी नाबाद दिल्यानंतर राहुलने डीआरएस घेतला. यात पडिक्कलच्या बॅटला चेंडू लागल्याटचे स्निकोमनध्ये दिसत होते. मात्र तिसऱ्या पंचांनी पडिक्कलला नाबाद ठरवले. या धक्कादायक निर्णयानंतर राहुलने मैदानातील पंचांशी याबाबत वाद घातला.

Dinesh Karthik Hits 108 m Longest Six of IPL 2024
VIDEO: शेवटच्या हंगामात दिनेश कार्तिकची धूम; पल्लेदार षटकार आणि झुंजार इनिंग्ज
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
Mayank Yadav Reveals About Fitness
IPL 2024 : सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवच्या फिटनेसचं रहस्य काय? त्यानंच सांगितलं तो काय करतो?
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: विराट कोहलीला आऊट करत घेतली आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट, कोण आहे मनिमरण सिध्दार्थ?

हेही वाचा – IPL 2021 : सुमार कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सचा कृणाल पंड्या ट्रोल; नेटकऱ्यांनी बनवले मजेशीर मीम्स!

पंच आर्यन खानसोबत?

समालोचकांनीही याबाबत पंचांच्या निर्णयावर असहमती दर्शवली. खराब निर्णयामुळे पंजाबला विकेट मिळाली नाही, सोबतच त्यांनी रिव्ह्यूही गमावला. नेटकऱ्यांनी या सामन्यातील पंचांचा संबंध आर्यन खानशी जोडला. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर कारवाई करत अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) आठ जणांना ताब्यात घेतले.एनसीबीने केलेल्या या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ माजली आहे. याचे कारण म्हणजे ताब्यात घेतलेल्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे. आर्यन खानचा जवळचा मित्र अरबाज मर्चंटदेखील यावेळी उपस्थित होता. या सर्वांची सध्या एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.

देवनदत्त पडिक्कल-विराट कोहलीने संघासाठी ६८ धावा केल्या. १०व्या षटकात पंजाबचा गोलंदाज मोझेस हेन्रिक्सने विराटचा काटा काढला. विराटने २ चौकार आणि एका षटकारासह २५ धावा केल्या. त्यानंतर जीवदान मिळालेला पडिक्कलही माघारी परतला. १२व्या षटकात हेन्रिक्सनेच त्या वैयक्तिक ४० धावांवर बाद केले. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि २ षटकार मारले.