इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेच्या २०२१ च्या हंगामासाठी १८ फेब्रुवारी रोजी लिलाव होणार आहे. लिलाव प्रक्रियेला दुपारी ३ वाजता प्रारंभ होईल. प्रत्येक संघात कमाल २५ खेळाडूंना स्थान देता येते. लिलावासाठी खेळाडूंच्या नोंदणीची मुदत गुरुवारी संपली असून, यात ८१४ भारतीय आणि २८३ परदेशी खेळाडूंचा यात समावेश आहे. २०७ आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू उपलब्ध असून, यात २१ भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे. तसेच ८६३ बिगरआंतरराष्ट्रीय खेळाडूंचा मोठा भरणा असून, यात ७४३ भारतीय व ६८ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

लिलावात वेस्ट इंडिजच्या सर्वाधिक ५६ क्रिकेटपटूंचा समावेश आहे. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे ४२ आणि दक्षिण आफ्रिकेचे ३८ खेळाडू उपलब्ध आहेत. संलग्न राष्ट्रांच्याही २७ खेळाडूंची यात नोंद आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांनी लिलावातून माघार घेतली आहे. काही दिग्गज खेळाडूही लिलावाच्या मैदानात उतरले आहेत. पाहूयात दोन कोटी मूळ किंमत असणाऱ्या खेळाडूंची यादी…

या खेळाडूंची मूळ किंमत दोन कोटी रुपये आहे..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केदार जाधव
हरभजन सिंह
ग्लेन मॅक्सवेल<br />स्टीव स्मिथ
शाकिब अल हसन
मोईन अली
सॅम बिलिंग्स
लियाम प्लंकेट
जेसन रॉय
मार्क वुडे
कॉलिन इन्ग्राम
अॅरोन फिंच
ख्रिस मॉरिस