आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांसाठी कोलकाता नाईट रायडर्सने न्यूझीलंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीला संघात घेतले आहे. पॅट कमिन्सच्या जागी टीम साऊदी संघात सामील होईल. कमिन्सने यूएई स्टेजमध्ये सहभागी होण्यास आधीच नकार दिला होता. पॅट कमिन्स बाबा होणार असल्याने त्याला आपल्या पत्नीला वेळ द्यायचा आहे.

टिम साऊदी आयपीएल खेळणार नसल्याने तो आता न्यूझीलंडसमवेत बांगलादेश आणि पाकिस्तानचा दौरा करणार नाही. ३३ वर्षीय साऊदीने यापूर्वी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले आहे.

 

आयपीएलमधील टीम साऊदीची कामगिरी मात्र सामान्य आहे. त्याने ४० सामन्यांमध्ये फक्त २८ विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट ८.७४ असा होता. २०१९पासून साऊदीला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. साऊदीच्या समावेशामुळे, दोन वेळा आयपीएल चॅम्पियन केकेआरला यूएईमध्ये प्लेऑफमध्ये स्थान मिळण्याची आशा असेल. कोलकाताचा संघ सध्या सातव्या स्थानावर आहे. त्याने सात पैकी फक्त दोन सामने जिंकले होते.

हेही वाचा – VIDEO : …अन् सिक्स मारल्यानंतर जेव्हा धोनीच अंधारात बॉल शोधायला जातो!

कोलकाताचा संघ शुबमन गिल आणि दिनेश कार्तिक यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करेल. टी-२० विश्वचषक पाहता दोन्ही खेळाडूंसाठी आयपीएल २०२१ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. २०१८पासून केकेआरला प्लेऑफमध्ये स्थान मिळालेले नाही. केकेआर आपला पहिला सामना २० सप्टेंबर रोजी आरसीबी विरुद्ध खेळेल.