Indian primer League 2024: आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी ( १९ डिसेंबर) होत आहे. पहिल्यांदाच हा लिलाव देशाबाहेर आयोजित केला जाणार आहे. या खेळाडूंवर दुबईत बोली लावली जात आहे. लिलावाच्या एक दिवस आधी, बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना १७व्या हंगामाच्या विंडोबद्दल माहिती दिली आहे. बीसीसीआयने १० संघांना सांगितले की ही स्पर्धा २२ मार्च ते पुढील वर्षी मे अखेरपर्यंत आयोजित केली जाऊ शकते.

“पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यानंतरच वेळापत्रकावर अंतिम निर्णय घेतला जाईल,” असेही बीसीसीआयने म्हटले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील, असे मानले जात आहे. याशिवाय बीसीसीआयने या सीझनमध्ये परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबतही सर्व संघांना माहिती दिली आहे. यामुळे संघांना लिलावात योग्य खेळाडूंची निवड करण्यात मदत होईल.

Shiv Panvel Highway, Accident, Accident on Shiv Panvel Highway, Ola App Passengers, Raises Safety Concerns, ola drivers, ola cab, marathi news, panvel news, panvel, accident news,
शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?
guru asta 2024
१४ दिवसांनी गुरु होणार अस्त! ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; नोकरीपासून प्रेमापर्यंत प्रत्येक कामात मिळू शकते यश
New Tax System, New Tax System Criteria, tax deduction, tax pay, Home Loan tax deduction, Tax Regime, New Tax System, finance article, tax article, marathi finance articles,
करावे कर समाधान : नवीन करप्रणाली निवडण्याचे निकष
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?

हेही वाचा: स्टार्क, कमिन्स, रवींद्रकडे लक्ष!‘आयपीएल’ लिलाव आज दुबईत; ३३३ क्रिकेटपटूंचा सहभाग

जोश हेझलवूड मार्चएप्रिलमध्ये उपलब्ध होणार नाही

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याला लिलावात दोन कोटी रुपये मूळ किंमत ठेवण्यात आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात तो खेळण्यासाठी उपलब्ध होणार नाही. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तो आयपीएलमध्ये आपल्या संघात सहभागी होऊ शकेल. त्याची पत्नी सेरिना मर्फी ख्रिश्चन आई होणार असल्याचे मानले जात आहे. त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असतील.

रेहान अहमद लिलावातून इंग्लंडने माघार घेतली

इंग्लंड २२ ते ३० मे या कालावधीत टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानचे यजमानपद भूषवणार आहे, परंतु ईसीबीने आयपीएलला सांगितले आहे की त्यांचे खेळाडू संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असतील. मात्र, हे फिटनेस आणि आंतरराष्ट्रीय कर्तव्यावर अवलंबून असेल. ईसीबीने हे देखील उघड केले की जर एखाद्या खेळाडूला टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी विशिष्ट व्यवस्थापनाची आवश्यकता असेल तर त्याचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की थेट खेळाडू आणि त्याच्या फ्रँचायझीशी संपर्क साधतील.

हॅरी ब्रूक, फिल सॉल्ट, ख्रिस वोक्स आणि आदिल रशीद हे लिलावात दाखल झालेल्या इंग्लंडच्या काही अव्वल खेळाडूंपैकी आहेत. ईएसक्रीकइन्फोच्या वृत्तानुसार, १९ वर्षीय लेग-स्पिनर अष्टपैलू रेहान अहमदने लिलावातून माघार घेतली आहे. त्याची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. रेहान पुढील वर्षाच्या सुरुवातीला पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड त्यांना लहान वयात घरापासून दूर जास्त वेळ घालवण्यापासून संरक्षित करू इच्छित आहे.

हेही वाचा: IPL 2024 Auction: आयपीएल लिलावात राईट टू मॅच कार्ड वापरले जाईल का? जाणून घ्या सर्व नियम

हसरंगा आणि चमीरा उपलब्ध असतील

संपूर्ण आयपीएल २०२४ साठी श्रीलंका क्रिकेटने आपले सर्व प्रमुख खेळाडू उपलब्ध करून दिले आहेत. यात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या महिष तिक्षाना, मथिशा पाथीराना, वानिंदू हसरंगा आणि दुष्मंथा चमीरा यांचा समावेश आहे. या चार खेळाडूंपैकी एकही खेळाडू ३ एप्रिलपर्यंत बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणाऱ्या श्रीलंकेच्या कसोटी संघाचा भाग असणार नाही. लिलावात खरेदी केलेले इतर कसोटीपटू मालिकेनंतर आयपीएलसाठी उपलब्ध होतील.

तस्किन आणि शरीफुल यांनी लिलावातून माघार घेतली

बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला लिलावात विकत घेतल्यास त्याला २२ मार्च ते ११ मे दरम्यान आयपीएल २०२४ खेळण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने परवानगी दिली आहे. त्याला दिल्ली कॅपिटल्सने सोडले. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. वेगवान गोलंदाज तस्किन अहमद आणि शरीफुल इस्लाम २०२४ हंगामासाठी उपलब्ध होणार नाहीत. मार्च-एप्रिलमध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्ध बांगलादेशच्या घरच्या मालिकेत तो खेळण्याची शक्यता आहे.