वृत्तसंस्था, नवी दिल्ली

इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) हवा त्याच्या लिलावापासून सुरू होते. जेवढे सामन्यांचे आकर्षण, तेवढेच लिलावाचेही असते. या वेळी लिलाव प्रक्रिया इतिहासात प्रथमच दुबईत पार पडणार आहे. यंदा होणाऱ्या लिलावात एकूण ३३३ क्रिकेटपटूंचा सहभाग असणार असून, यात २१४ भारतीय क्रिकेटपटू, तर ११९ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. दोन खेळाडू कसोटीचा दर्जा प्राप्त नसलेल्या (असोसिएट) देशांचे आहेत. या खेळाडूंपैकी ११६ हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले, तर २१५ हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले आहेत. सहभागी दहा संघ आपला संघ भक्कम करण्यासाठी प्रयत्न करतील.

cricketer ashish nehra fast bowler used to use nokia phone in smartphone world
ऑड मॅन आऊट! स्मार्टफोनच्या काळात नेहरा वापरायचा बाबा आझमच्या काळातला नोकिया फोन, २०१७ मध्ये उघडले होते व्हॉट्सअप
IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
Andre Russell Closed His Ears as fans cheer when ms dhoni came to bat
IPL 2024: धोनीची एंट्री होताच जल्लोष टिपेला; आंद्रे रसेलने ठेवले कानावर हात- व्हीडिओ व्हायरल
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी

 काही संघांनी मधल्या काळात खेळाडूंच्या अदलाबदलीच्या व्यवहारात संघ भक्कम करण्याचा थोडा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्ष लिलावात ३३३ खेळाडू असले, तरी प्रत्यक्षात सर्व संघांत मिळून ७७ खेळाडूंचीच गरज आहे. यात परदेशातील केवळ ३० खेळाडूंचाच समावेश आहे. सर्व संघांचा कल अनुभवता अष्टपैलू क्रिकेटपटूंवर अधिक गुंतवणूक होण्याचीच शक्यता अधिक आहे.

हेही वाचा >>>IPL 2024 Auction: आयपीएल लिलावात सर्वात महाग कोण विकले जाईल अन् कोण अनसोल्ड राहणार? माजी SRH प्रशिक्षकाने वर्तवला अंदाज

संघांकडे उपलब्ध खर्च क्षमता

’ गुजरात टायटन्स : ३८.१५ कोटी रुपये; आठ जागा रिक्त (दोन परदेशी खेळाडूंसाठी)

’ सनरायजर्स हैदराबाद : ३४ कोटी रुपये; सहा जागा रिक्त (तीन परदेशी खेळाडूंसाठी)

’ कोलकाता नाइट रायडर्स : ३२.७ कोटी रुपये; १२ जागा रिक्त (चार परदेशी खेळाडूंसाठी)

चेन्नई सुपर किंग्ज : ३१.४ कोटी रुपये; सहा जागा रिक्त (तीन परदेशी खेळाडूंसाठी)

पंजाब किंग्ज : २९.१ कोटी रुपये; आठ जागा रिक्त (दोन परदेशी खेळाडूंसाठी)

’ दिल्ली कॅपिटल्स : २८.९५ कोटी रुपये; नऊ जागा रिक्त (चार परदेशी खेळाडूंसाठी)

’ रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु : २३.२५ कोटी रुपये; सहा जागा रिक्त (तीन परदेशी खेळाडूंसाठी)

मुंबई इंडियन्स : १७.७५ कोटी रुपये; आठ जागा रिक्त (चार परदेशी खेळाडूंसाठी)

’ राजस्थान रॉयल्स : १४.५ कोटी रुपये; आठ जागा रिक्त (तीन परदेशी खेळाडूंसाठी)

’ लखनऊ सुपर जायंट्स : १३.१५ कोटी रुपये; सहा जागा रिक्त (दोन परदेशी खेळाडूंसाठी)

कोणते खेळाडू ठरणार लक्षवेधी

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क, कर्णधार पॅट कमिन्स, न्यूझीलंडचा रचिन रवींद्र हे खेळाडू प्रामुख्याने चर्चेत असतील. यासह ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड, सलामीवीर ट्रॅव्हिस हेड, इंग्लंडचा आक्रमक फलंदाज हॅरी ब्रूक, न्यूझीलंडचा फलंदाज डॅरेल मिचेल, अफगाणिस्तानचा अझमतुल्ला ओमरझाई, फिरकीपटूंमध्ये श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा, दक्षिण आफ्रिकेचे केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांच्यासह भारताच्या शार्दूल ठाकूर, हर्षल पटेल, शिवम मावी यांना चांगली रक्कम मिळू शकते.