गतवर्षीच्या ‘स्पॉट-फिक्सिंग’प्रकरणाची काळी छाया.. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेले वाद-विवाद.. बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची हकालपट्टी.. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांची आयपीएलपर्यंत बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर झालेली नियुक्ती या सर्व पाश्र्वभूमीवर आयपीएलच्या सातव्या पर्वाचे दार बुधवारपासून उघडणार आहे. भारतामध्ये सध्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने यंदाच्या स्पर्धेचे पहिले पर्व संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात येणार आहे, तर २ मेपासून दुसऱ्या पर्वाला भारतामध्ये सुरुवात होणार आहे. यंदाच्या स्पर्धेचे बिगुल वाजणार आहे ते गतविजेता मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामधील सामन्याने.
मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या कप्तानीखाली गेल्या वर्षी कमाल केली होती. आयपीएलबरोबरच चॅम्पियन्स लीगचेही जेतेपद त्यांनी पटकावत महान फलंदाज सचिन तेंडुलकरला सुखद निरोप दिला होता. यंदाच्या वर्षी सचिन मुंबईकडून खेळणार नसला तरी तो मार्गदर्शकाच्या भूमिकेतून संघाच्या पाठीशी असेल. माइक हसीसारखा ‘धावांची रनमशिन’ म्हणून ओळखला जाणारा दादा फलंदाज मुंबईच्या ताफ्यात असल्याने संघाची फलंदाजी अधिकाधिक बळकट होईल. मुंबईच्या संघात फलंदाजीमध्ये रोहित, किरॉन पोलार्ड, अंबाती रायुडूसारखे नावाजलेले फलंदाज आहेत. त्याचबरोबर आदित्य तरे, आणि सी.एम.गौतमसारखे स्थानिक स्पर्धामध्ये दमदार कामगिरी करणारे फलंदाज आहेत. त्याचबरोबर कोरे अ‍ॅन्डरसनसारखा नावाजलेला अष्टपैलू खेळाडू या संघात आहे. गोलंदाजीमध्येही झहीर खानसारखा अनुभवी गोलंदाज संघात आला आहे, त्याचा नक्कीच संघाला फायदा होईल. त्याचबरोबर लसिथ मलिंगा, हरभजन सिंग, प्रग्यान ओझासारखे अनुभवी गोलंदाज आहेत. तर स्थानिक स्पर्धा गाजवणारा जसप्रीत बुमहारही संघात आहे.
कोलकात्याच्या संघात मोठे बदल नसले तरी त्यांचा संघ चांगलाच समतोल आहे. गंभीरसारखा सलामीवीर, रॉबिन उथप्पा, युसूफ पठाणसारखे तडाखेबंद फलंदाज आणि जॅक कॅलिससारखा अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू संघात आहे. त्याचबरोबर गोलंदाजीची जबाबदारी फिरकीपटू सुनील नरीन, मॉर्ने मॉर्केल यांच्यावर असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), लसिथ मलिंगा, किरॉन पोलार्ड, हरभजन सिंग, अंबाती रायुडू, माइक हसी, झहीर खान, प्रग्यान ओझा, कोरे अ‍ॅन्डरसन, जोश हॅझलवूड, सीएम गौतम, आदित्य तरे, अपूर्व वानखेडे, मर्चंट डी लँग, क्रिशमर सॅन्टोकी, जसप्रीत बुमराह, बेन डंक, पवन सुयल, सुशांत मराठे, श्रेयस गोपाल आणि सलाज सक्सेना.
कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), सुनील नरीन, जॅक कॅलिस, रॉबिन उथप्पा, युसूफ पठाण, शकिब-अल-हसन, उमेश यादव, विनय कुमार, मॉर्ने मॉर्केल, पियूष चावला, मनीष पांडे, वीर प्रताप सिंग, ख्रिस लीन, आंद्रे रसेल, एस.एस.मंडल, पॅट कमिन्स, देबब्रता दास, सूर्यकुमार यादव, मनविंदर बिस्ला, रायन टेन डोश्चटे आणि कुलदीप यादव.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 7 delhi daredevils opping match with kolkata knight riders
First published on: 16-04-2014 at 01:21 IST