राहुल द्रविड सारखा फलंदाज संघाच्या पाठीशी असणे हे माझे भाग्य असल्याचे राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार शेन वॉटसनने म्हटले आहे.
शेन वॉटसन म्हणतो की, “राहुल द्रविड संघाच्या पाठीशी असणे हे भाग्यच आहे. माझ्या सध्याच्या खेळीतील प्रगतीचे श्रेय काहीप्रमाणात राहुल द्रविडलाही आहे. माझ्या स्वत:साठी तरी राहुल संघाच्या पाठीशी असणे हे मी माझे भाग्य समजतो आणि त्याच्यासोबत याआधीच्या आयपीएलच्या पर्वात खेळण्याची संधी मला मिळाली त्याबद्दलही मी नशीबवान आहे. आता द्रविड संघासाठी खेळत नसला तरी, त्याचे संघासोबत असणे आमच्यासाठी भरपूर महत्वाचे आहे. त्याच्याकडून आम्हाला नेहमी नव्या जोमाने खेळण्याची प्रेरणा मिळते” असेही तो म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 7 lucky to have rahul dravid around as team mentor says shane watson
First published on: 12-05-2014 at 06:31 IST