मुंबईचा ज्येष्ठ फिरकीपटू प्रवीण तांबे आयपीएलच्या तेराव्या हंगामातला सर्वात ज्येष्ठ खेळाडू ठरला आहे. ४८ वर्षीय प्रवीण तांबेवर कोलकाता नाईट रायडर्सने २० लाखांची बोली लावली आहे. प्रवीने २०१३ साली आयपीएलमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकलं. राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना प्रवीणने गोलंदाजीत आपलं कौशल्य दाखवून दिलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून २०१४ च्या हंगामात प्रवीण तांबेच्या नावावर हॅटट्रीकची नोंद आहे. याव्यतिरीक्त टी-१० लिग स्पर्धेतही प्रवीणने हॅटट्रीक नोंदवली होती. अशी कामगिरी करणारा प्रवीण पहिला गोलंदाज ठरला होता. आयपीएलमध्ये आतापर्यंतच्या कारकिर्दीत प्रवीणच्या नावावर २८ बळी जमा आहेत. त्यामुळे आयपीएलच्या आगामी हंगामात प्रवीण तांबेला कोलकात्याच्या अंतिम ११ जणांच्या संघात जागा मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा संपूर्ण संघ