रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या थरारक सामन्यात शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. काल रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विजय मिळवला. यासंदर्भात, सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रविवारी सांगितले की, “सीएसके आयपीएलमध्ये केकेआरविरुद्ध फारसा चांगला खेळला नाही. पण तरीही विजय नोंदवणे आनंददायी आहे. जेव्हा आपण चांगले खेळत नाही आणि तरी संघ जिंकतो तेव्हा मजा येते.” 

आयपीएल २०२१ स्पर्धेतील अतितटीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं कोलकात्याला २ गडी राखून नमवलं. कोलकात्याने ७ गडी गमवून विजयासाठी १७२ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान चेन्नईनं ८ गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह चेन्नईचा संघ आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला. शेवटच्या षटकांत आक्रमक खेळी करत रवींद्र जडेजाने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

“धोनीच्या रणनीतीमध्ये ९० टक्क्यांपर्यंत…” मायकेल वॉनचे मोठे विधान

केकेआरची केली स्तुती

चेन्नईचा कर्णधार पुढे म्हणाला, “आम्ही तुकड्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली. वेगवान गोलंदाजांसाठी ते सोपे नव्हते. आम्ही त्यांना लहान स्पेल देण्याचा प्रयत्न केला. १७० चा स्कोअर सहज गाठता आला असता. ज्या प्रकारे आम्ही सुरुवात केली, तरीही, जर केकेआर विजयाच्या जवळ येतो पोहोचत असेल, तर ते स्तुतीस पात्र आहेत.”

IPL सुरु असतानाच CSK साठी खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूने घेतला निवृत्तीचा निर्णय

चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनी सामन्यानंतर म्हणाला, “हा एक महान विजय होता. कधीकधी तुम्ही चांगले क्रिकेट खेळता आणि तुम्ही हरता. जेव्हा तुम्ही चांगले खेळत नाही पण तरीही जिंकता तेव्हा मजा येते. दोन्ही संघांनी चांगले क्रिकेट खेळले आणि प्रेक्षकांनी आनंद घेतला.” या सामन्यात, धोनी फक्त एक धाव करू शकला. वरूण चक्रवर्तीने त्याला क्लीन बोल्ड केले.