‘या’ फिरकीपटूंना मिळाला आयपीएलमध्ये पहिलं षटक टाकण्याचा मान

फिरकीपटूंच्या यादीत कोणते गोलंदाज आहेत? वाचा

आयपीएलमध्ये कायमच फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं. गोलंदाज कधी एकदा बॉल टाकतो आणि कधी एकदा सीमेपार नेतो असं फलंदाजांच्या डोक्यात असतं. त्यामुळे चेंडू गोलंदाजांच्या हातात टेकवताना कर्णधाराला विचार करावा लागतो. त्यात बॅटिंग पॉवर प्ले म्हणजे फलंदाजासाठी आयती संधीच असते. कारण या पॉवर प्ले दरम्यान ३० यार्डच्या बाहेर खूप कमी खेळाडू असतात आणि याचा थेट फायदा फलंदाजांना होतो. उंचावरून चेंडू सीमेपलीकडे खेचण्यासाठी अडचणी येत नाही. कमी ताकद लागली तरी चौकार तर निश्चित मिळतो. त्यामुळे कर्णधार सुरुवातीचे षटकं वेगवान गोलंदाजांकडे सोपवतात. मात्र आयपीएलच्या कारकिर्दीत हरभजन सिंग, शाहबाज नदीम आणि आर. अश्विन या फिरकीपटूंवर कर्णधाराने विश्वास दाखवत पहिलं षटक सोपवलं आहे.

हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाताच्या कर्णधाराने पहिलं षटक फिरकीपटू हरभजन सिंग याच्या हाती सोपवलं. त्याच्या षटकात कमिन्सनं वॉर्नरचा झेल सोडला आणि हरभजन निराश झाला. असं असलं तरी हरभजनने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत ३६ वेळा पहिलं षटक टाकलं आहे. २०१७ पर्यंत हरभजनसिंग मुंबई इंडियन्स संघासोबत होता. त्यानंतर २०१८ ते २०२० या कालावधीत चेन्नई सुपर किंग्ससोबत खेळला. आता तो कोलकाला नाइटराइडर्स ताफ्यात आहे.

दिल्लीकडून मिळालेल्या पराभवानंतर चेन्नईची ‘बिर्याणी’ शिजली!

हरभजननंतर भारतीय फिरकीपटू आर. अश्विन याचा क्रमांक येतो. आर. अश्विनने आपल्या फिरकीच्या जादूवर चांगले चांगले फलंदाज तंबूत पाठवलेत. त्यामुळे आयपीएलमध्ये पहिलं षटक टाकण्यासाठी कर्णधारांनी त्याच्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्याने आतापर्यंत ३३ वेळा पहिलं षटक टाकलं आहे. अश्विनची खासियत म्हणजे त्याला नवा चेंडूने गोलंदाजी करणं सहज शक्य होतं. त्यामुळे अनेकदा फलंदाज मोठा फटका मारण्याच्या नादात बाद होतात.

IPL 2021 : आंद्रे रसेलच्या ‘या’ विधानाने जिंकली भारतीयांची मने

हरभजन, अश्विननंतर शाहबाद नदीमवर त्या त्या संघाच्या कर्णधाराने विश्वास दाखवलाय. शाहबाजने आतापर्यंत २३ वेळा पहिलं षटकं टाकलं आहे. शाहबाद ७ वर्षे दिल्ली डेअरडेविल्स संघाचा भाग होता. त्यानंतर २०१८ पासून शाहबाद सनराइज हैदराबादकडून खेळत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl history these spin bowlers get first bowling rmt

ताज्या बातम्या