जागतिक ६-रेड स्नूकर अजिंक्यपद स्पध्रेचा ताज शिरपेचात रोवून ऐतिहासिक १३वे जागतिक अजिंक्यपद पटकावणाऱ्या पंकज अडवाणीने इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर स्नूकर आणि बिलियर्डमध्येही लीग शक्य असल्याचे मत व्यक्त केले. चीनच्या यान बिंगटाओचा ६-२ असा पराभव करून अडवाणीने मंगळवारी जागतिक ६-रेड स्नूकर स्पध्रेचे जेतेपद कायम राखले होते. भारतात या खेळाची भरभराट होताना पाहण्यासाठी तो उत्सुक आहे. ‘‘आयपीएलच्या धर्तीवर स्नूकर किंवा बिलियर्डची लीग होणे शक्य आहे. दीर्घ काळापासून मी हा खेळ खेळत आहे आणि या खेळातही आर्थिक फायदा आहे. भारतात या खेळाला उज्ज्वल भविष्य आहे. ६-रेड प्रकार लोकांचे लक्ष वेधत आहे,’’ असे मत अडवाणीने व्यक्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Aug 2015 रोजी प्रकाशित
आयपीएलच्या धर्तीवर स्नूकर, बिलियर्ड लीग शक्य -अडवाणी
जागतिक ६-रेड स्नूकर अजिंक्यपद स्पध्रेचा ताज शिरपेचात रोवून ऐतिहासिक १३वे जागतिक अजिंक्यपद पटकावणाऱ्या पंकज अडवाणीने...
First published on: 13-08-2015 at 06:35 IST
TOPICSपंकज अडवाणी
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl like league possible in snooker billiards says pankaj advani