Brad Hogg on Riyan Parag : आयपीएल २०२४ चा उत्साह कायम आहे. राजस्थान रॉयल्स हा असा एकमेव संघ आहे, ज्याला आतापर्यंत कोणत्याही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला नाही. राजस्थानने चार सामन्यांत चार विजय मिळवले आहे. त्यांच्या विजयात रियान परागने सर्वात महत्त्वाचे योगदान दिले आहे. सध्या तो १८५ धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कायम आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने या युवा फलंदाजाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. गेल्या वर्षी त्याच्यामध्ये प्रचंड गर्व होता, असे त्याने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएलच्या १७ व्या हंगामातील २४ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होण्यापूर्वी माजी खेळाडू ब्रॅड हॉगने मोठं वक्तव्य केले आहे. गेल्या वर्षी रियानमध्ये थोडा अहंकार होता, असा दावा ब्रॅड हॉगने केला. मात्र, आता तो नियंत्रणात आहे. तेव्हापासून रियानचे एक जुने ट्विट चर्चेत आहे. ज्यामध्ये त्याने एका षटकात चार षटकार मारणार असल्याचा दावा केला होता.

रियान परागबद्दल ब्रॅड हॉगचे मोठं वक्तव्य –

ब्रॅड हॉग म्हणाला, “जेव्हा मी तरुण परागला पाहतो, तेव्हा मला खूप बरे वाटते. आयपीएलच्या इतिहासात अर्धशतक झळकावणारा तो सर्वात तरुण खेळाडू आहे. मला त्याची ऊर्जा आणि क्षेत्ररक्षण करण्याची पद्धत आवडते. मला वाटते की तो या वर्षी खरोखरच परिपक्व झाला आहे. गेल्या वर्षी मला वाटते त्याच्यामध्ये थोडा अहंकार होता.” तो पुढे म्हणाला, “मी हे अनादराने म्हणत नाही, परंतु मला वाटते की गेल्या वर्षी त्याच्यामध्ये थोडासा अहंकार होता आणि अजूनही आहे, परंतु तो नियंत्रणात आहे. त्याचा स्वतःवर विश्वास आहे. आता तो संघात आपले स्थान निश्चित करण्यापेक्षा संघासाठी काय करू शकतो याची त्याला अधिक काळजी आहे.”

हेही वाचा – VIDEO : ‘जर तुला मूल हवे असेल तर …’, साक्षीने धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून लवकर निवृत्तीचे खरे कारण सांगितले

रियान परागचे जुने ट्विट व्हायरल –

खरं तर, गेल्या वर्षी २२ वर्षीय फलंदाजाने एका ट्विटमध्ये दावा केला होता की, तो आयपीएल २०२३ मध्ये एका षटकात चार षटकार मारू शकतो. मात्र, त्याला तसे करता आले नाही. हॉगने हे वक्तव्य त्यांच्या ट्विटच्या संदर्भात दिल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा – IPL 2024 : मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर मुलाने मारला ‘हेलिकॉप्टर शॉट’, VIDEO होतोय व्हायरल

हॉगकडून राजस्थान रॉयल्सच्या कामगिरीचे कौतुक –

यादरम्यान माजी गोलंदाजाने राजस्थान रॉयल्सच्या कामगिरीवरही आपले मत मांडले. त्याने सांगितले की, यावेळी संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली संघ खूपच संतुलित दिसत आहे. त्याचबरोबर संदीप शर्मा दुखापतीतून सावरल्यास गोलंदाजी अधिक मजबूत होऊ शकते. ब्रॅड हॉग म्हणाला, “माझ्या मते, राजस्थान रॉयल्स हा स्पर्धेतील सर्वात संतुलित संघ आहे. त्यांनी ज्या प्रकारे त्यांची संपूर्ण लाइनअप सेट केली आहे, ते मला आवडते. जर संदीप शर्माही पूर्णपणे तंदुरुस्त झाला, तर तो सहावा गोलंदाजी पर्याय म्हणून संघात सामील होऊ शकतो.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to former spinner brad hogg rr young batsman riyan parag had eggo last year and this year too vbm
First published on: 10-04-2024 at 19:28 IST