Urvashi upset over last name spoiling: टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्यातील लिंकअप सोशल मीडियावर थांबण्याचे नाव घेत नाही आहे. जेव्हा जेव्हा दोन्ही सेलिब्रिटी सार्वजनिक ठिकाणी कुठेतरी स्पॉट होतात, तेव्हा एकमेकांचे नाव घेऊन त्यांना डिवचले जाते. उर्वशीसोबत असणाऱ्या अफवांमध्ये तथ्य नसल्याचे ऋषभने स्पष्ट केले असले, तरी उर्वशीच्या बाजूने असे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र असे काही चाहते आहेत की, जे अजूनही एकमेकांचे नाव घेऊन त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करतात.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

असाच एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांत इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक क्रिकेट चाहता अक्षर पटेलला आयपीएल सामन्यादरम्यान म्हणतो, “अक्षर भाऊ ऋषभला म्हणा की आम्ही तुझ्या सोबत आहे उर्वशी रौटोलाला सोडणार नाही.” अक्षरनेही त्या चाहत्याकडे पाहिलं आणि स्मितहास्य केलं. आता हा व्हिडिओ उर्वशी रौतेलापर्यंत पोहोचला असून तिने यावर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, तिच्या नाराजीचे कारण त्याचे नाव ऋषभसोबत जोडणे नसून दुसरेच आहे.

Kareena Kapoor Khans wax figure a woman first reaction goes viral on social media
VIDEO : करीना कपूरला पाहताच महिलेनी केले असे कृत्य…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Prajwal Revanna in Trouble
‘सेक्स व्हिडिओचा तो पेनड्राईव्ह मीच दिला’, रेवण्णाच्या ड्रायव्हरचा धक्कादायक दावा; म्हणाला, “त्यांनी माझ्या बायकोला…”
Virat Kohli's reaction on strike rate
विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन टीका करणाऱ्यांना फटकारले; म्हणाला, ‘जे लोक दुसऱ्यावर टीका करतात त्यांनी स्वत:…’
UFO spotted during solar eclipse viral video
सूर्यग्रहण लागताना आकाशात दिसले ‘UFO’? व्हिडीओत कैद झालेले दृश्य पाहा; तुम्हीही व्हाल चकित

व्हायरल व्हिडिओ उर्वशीपर्यंत पोहोचला –

उर्वशीने शनिवारी इन्स्टाग्रामवर व्हायरल व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले की, “माझे आडनाव खराब करणे थांबवा, जे माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. आडनावातील शब्दांचा अर्थ शक्ती आणि आशीर्वाद असा होतो.” उर्वशीने या व्हिडिओमध्ये तिचे चुकीचे आडनाव घेतल्याने संताप व्यक्त केला आहे. उर्वशीने शेअर केलेल्या व्हिडिओमधून ऋषभ पंतचे नाव कट करण्यात आले आहे.

लोकांनी केल्या मजेशीर कमेंट्स –

उर्वशी रौतेलाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केलेल्या व्हिडिओवर लोकांच्या मजेदार कमेंट्सही येत आहेत. एका यूजरने म्हटले आहे,“ऋषभ भैयाशी लग्न करा, सर्वांची तोंडे बंद होतील वहिनी”. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, ”असे लोक तुमच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्यासाठी असे करतात.”

हेही वाचा – GT vs MI: राशिद खान-अल्झारी जोसेफ जोडीने रचला इतिहास, आयपीएलमध्ये नवव्या विकेटसाठी केला मोठा विक्रम

ऋषभ सध्या क्रिकेटपासून दूर आहे –

क्रिकेटर ऋषभ पंत मैदानापासून दूर आहे. ३१ डिसेंबर २०२२ रोजी दिल्लीहून रुरकीला जात असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या कारने पेट घेतला होता. ऋषभने कारमधून उडी मारून आपला जीव वाचवला. या अपघातापूर्वी ऋषभ आणि उर्वशीची नावे पहिल्यांदा २०१८ मध्ये एकत्र जोडली गेली होती. त्यावेळी दोघे एकत्र एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसल्याच्या बातम्या आल्या होत्या.