SRH gift Heinrich Klaassen with a gold chain : आयपीएल २०२४ च्या आठव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दमदार कामगिरी करत मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव केला. हैदराबादचा या स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे, ज्यात अनेक विक्रम रचले गेले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली संघाने आयपीएलच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्या उभारली. संघाने २० षटकांत ३ गडी गमावून २७७ धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून मुंबईला २० षटकांत ५ गडी गमावून २४६ धावा करता आल्या. या विजयात हेनरिच क्लासेनने महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यानंतर त्याला सनरायझर्स हैदराबादकडून एक खास गिफ्ट मिळाले.

राजीव गांधी आतंरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात हेनरिच क्लासेनने मुंबईविरुद्ध वादळी नाबाद ८० धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. हेनरिच क्लासेनने ३४ चेंडूचा सामना करताना चार चौकार आणि सात षटकारांचा पाऊस पाडत ८० धावांची नाबाद खेळी केली. ज्यामुळे हैदराबादला विक्रमी २७७ धावांची धावसंख्या उभारता आली. या सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबदने आपल्या इन्स्टाग्रामवर हेनरिच क्लासेनचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याला सनरायझर्स हैदराबादचा लोगो असलेली सोन्याची मोठी चेन भेट दिल्याचे दिसत आहे.

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: राहुल-क्विंटन चेन्नईला पडले भारी, लखनौचा दणदणीत विजय
Bengaluru man’s post on BMTC bus conductor
बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल
Robbers in Pakistan
कंगाल पाकिस्तानात दिवसाढवळ्या सामान्य जनतेला लुटण्याचा विचित्र प्रकार पाहून व्हाल थक्क; एकदा Video पाहाच!
mugdha godbole shared angry post after kshitee jog receiving negative comments
“मंगळसूत्र घालावं की नाही?”, क्षिजी जोगच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या गलिच्छ कमेंट्स, प्रसिद्ध अभिनेत्री संतापून म्हणाली…
Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?
pm narendra modi bill gates
Video: करोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? पंतप्रधान मोदी बिल गेट्सना म्हणाले, “..तेव्हा आमच्या देशात याची मस्करी झाली होती!”

सनरायझर्स हैदराबाद संघाला यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात केकेआरकडून अवघ्या चार धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यातही हेनरिच क्लासेनने संघासाठी दमदार खेळी साकारली होती. या सामन्यातही क्लासेनने आपला क्लास दाखवताना अवघ्या २९ चेंडूचा सामना करताना ८ गगनचुंबी षटकाराच्या जोरावर ६३ धावांची खेळी साकारली होती.

हेही वाचा – IPL 2024 : हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर हार्दिक पंड्याने दिली प्रतिक्रिया, सांगितले मुंबईच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण

दुसऱ्या सामन्यात हेनरिच क्लासेनशिवाय ट्रॅव्हिस हेडने २४ चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या, तर अभिषेक शर्माने २३ चेंडूंत तीन चौकार आणि सात षटकारांसह ६३ धावा केल्या. हे दोघेही बाद झाल्यानंतर हेनरिच क्लासेन आणि एडन मार्करम (२८ चेंडूत नाबाद ४२, दोन चौकार, एक षटकार) यांनी ५५ चेंडूत नाबाद ११६ धावांची भागीदारी केली. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघाने २० षटकांत ५ गडी गमावून २४६ धावा केल्या. ज्यामुळे सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव केला यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला.

हैदराबादने नोंदवली आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या –

यापूर्वी, आयपीएलमधील डावांची सर्वाधिक धावसंख्या २६३ धावा होती. २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पुणे वॉरियर्सविरूद्ध हा पराक्रम केला होता. मागील हंगामात, लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जविरूद्ध २५७ धावा केल्या होत्या. आयपीएल २०१६ मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात लायन्सविरुद्ध २४८ धावा केल्या होत्या. २०१० मध्ये चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सविरुद्ध २६६ धावांची नोंद केली होती.