बॉल टॅम्परिंग प्रकरणात, एक वर्षाच्या बंदीची शिक्षा भोगत असलेल्या डेव्हिड वॉर्नरने सनराईजर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला होता. या जागेवर आता न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याची वर्णी लागलेली आहे. सनराईजर्स हैदराबाद संघाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विलियमसनच्या नेमणुकीबद्दल माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विलियमसनने डेव्हिड वॉर्नरची पाठराखण केली होती. वॉर्नरकडून चुक झाली असली तरीही तो वाईट माणून नाही असं म्हणत विलियमसनने वॉर्नरला आपला पाठींबा दर्शवला. वॉर्नरच्या अनुपस्थितीत शिखर धवनकडे सनराईजर्स हैदराबाद संघाचं नेतृत्व जाणार अशी चर्चा होती. मात्र सनराईजर्स हैदराबाद प्रशासनाने न्यूझीलंडच्या केन विलियमसनवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.

अवश्य वाचा – वॉर्नरकडून चूक झाली पण तो वाईट माणूस नाही – केन विलियमसन