आयपीएलच्या तेराव्या हंगामाला १९ तारखेपासून युएईत सुरुवात होणार आहे. अबु धाबीत गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगेल. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने या स्पर्धेचं आयोजन युएईत केलं आहे. प्रादूर्भाव होऊ नये यासाठी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्यासाठी खास Bio Secure Bubble तयार करण्यात आलंय. सामन्यांना सुरुवात झाल्यानंतर ठराविक व्यक्तींनाच या Bio Secure Bubble मध्ये प्रवेश मिळणार आहे.

अवश्य वाचा – यंदाचं आयपीएल मयांती लँगरविना ! Star Sports कडून नवीन यादी जाहीर

“प्रत्येक संघ सामन्यादरम्यान आपल्यासोबत १७ खेळाडू आणि प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि दोन वेटर मिळून १२ जणं सोबत घेऊ शकतात. खेळाडूंसाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी वेगवेगळ्या बसची सोय केलेली असेल. जे खेळाडू आणि सदस्य हॉटेलमध्ये तयार करण्यात आलेल्या Bubble मध्ये आहेत त्यांनाच यात संधी मिळेल. बसच्या क्षमतेच्या ५० टक्केच लोकांना प्रवास करण्याची मुभा मिळालेली आहे.” Bubble तयार करणाऱ्या कंपनीतील सूत्रांनी IANS ला माहिती दिली.

आयपीएलशी संबंधित शारजा, अबु धाबी आणि दुबई या तिन्ही शहरांतील खेळाडू व इतर सदस्य यांची प्रत्येक ६ दिवसांनी करोनाची चाचणी होईल. मग तो भारतीय असो किंवा इतर कोणत्याही देशाचा…स्पर्धेशी संबंध असलेल्या आणि खेळाडूंच्या संपर्कात येणारे सपोर्ट स्टाफ, हॉटेल कर्मचारी या सर्वांची करोना चाचणी होणार असल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या संघातील दोन खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे बीसीसीआयने करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सर्वांसाठी कडक नियम आखले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – IPL 2020 : UAE मध्ये मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीवर रोहित म्हणतो…