इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

नामांकित खेळाडूंचा भरणा असूनही लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या कोलकाता नाइट रायडर्ससमोर बुधवारी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) लढतीत चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असणार आहे.

कोलकाताचा संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी असला तरी आतापर्यंतच्या लढतीत त्यांचा फलंदाजीचा क्रम चुकीचा दिसून आला आहे. कार्तिक कर्णधार आणि फलंदाज या दोन्ही आघाडय़ांवर कमी आहे. दुसरीकडे शेन वॉटसनला सूर गवसला असून फॅफ डय़ू प्लेसिसच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे चेन्नईवरील ताण कमी झाला आहे.

* वेळ  :  सायं.७.३०वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि एचडी वाहिन्या