आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होण्याआधीच खेळाडूंची दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेण्यास सुरुवात झाली आहे. इंग्लंडचा सलामीवीर आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा जेसन रॉय दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्धची टी-२० मालिका खेळणार नाहीये. ESPNCricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार जेसन रॉयने आयपीएलमध्येही न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. जेसन रॉयच्या जागेवर दिल्लीच्या संघात ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज डॅनिअल सॅम्सला संघात स्थान देण्यात आल्याचं समजतंय. जेसन रॉय किंवा दिल्लीने अद्यावर यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

अवश्य वाचा – IPL 2020 : कोलकात्याला फटका, जलदगती गोलंदाज हॅरी गुर्ने दुखापतीमुळे स्पर्धेला मुकणार

काही दिवसांपूर्वी ख्रिस वोक्सनेही आयपीएलमधून माघार घेतल्यामुळे दिल्लीने अ‍ॅन्रिच नॉर्ट्जेला संघात स्थान दिलं होतं. यानंतर स्पर्धेतून माघार घेणारा जेसन रॉय हा दुसरा इंग्लिश खेळाडू ठरला आहे. दरम्यान, आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा युएईत खेळवली जाणार आहे. भारतात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. सध्या सर्व संघ युएईत क्वारंटाइन झाले आहेत.

अवश्य वाचा – इंग्लंडला धक्का, पाकविरुद्ध टी-२० मालिकेतून सलामीवीर जेसन रॉयची दुखापतीमुळे माघार