scorecardresearch

IPL 2022: स्टेडियममध्ये मॅचदरम्यान जोडप्याने केलं ‘किस’! ट्विटरवर आला मीम्सचा पूर

IPL 2022: गुजरात-दिल्ली मॅचदरम्यान प्रेमी युगल किस करताना कॅमेरात कैद झाले यामुळे कॅमेरामनच ट्रोल झाला

Couple kissed during match
Couple kissed during match

आयपीएलचा १५ वा हंगाम सुरू असून आठवडाभरात चाहत्यांना क्रिकेटमध्ये अजून चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. प्रदीर्घ काळानंतर भारतात आयोजित करण्यात येत असलेल्या देशातील प्रसिद्ध टी-२० लीगमध्ये स्टेडियममध्ये प्रेक्षकांची एन्ट्री झाली आहे आणि तेही त्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत. प्रेक्षक परतल्याने स्टेडियमचे वातावरणही उत्साहाने भरले आहे. यावेळी ५० टक्के प्रेक्षकांसह सेलिब्रिटी आणि चाहतेही मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये पोहोचले आहेत.

शनिवारी, लीगमधील १० वा सामना दुहेरी हेडरखाली खेळला गेला. यामध्ये दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरशीची लढत झाली. चढ-उतारांनी भरलेल्या या सामन्यात खेळाडूंशिवाय एका प्रेमळ जोडप्यानेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. सामन्यादरम्यान स्टँडवर बसलेले एक जोडपे कीस करताना दिसले. यानंतर त्याचा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.
जोडप्याचा कीस करतानाचा फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर नेटीझन्सने त्यांच्या शैलीत मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे हा संपूर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या कॅमेरामनचा लोकांनी आनंद लुटण्यास सुरुवात केली.

(हे ही वाचा: रोहित शर्माच्या नेतृत्वात ‘या’ गोलंदाजाचा होऊ शकतो टीम इंडियात प्रवेश! IPL मध्ये करतोय धडाकेबाज गोलंदाजी)

(हे ही वाचा: Photos: …जेव्हा IPL मध्ये वयाच्या ४१व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या प्रवीण तांबेंवर आणली होती बंदी)

गुजरातच्या १७१ धावांना प्रत्युत्तर देताना दिल्लीचा संघ २० षटकांत केवळ १५७ धावाच करू शकला आणि सामना गमावला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 couple kissed during match in stadium a flood of memes hit twitter ttg

ताज्या बातम्या