आयपीएलच्या पंधराव्या पर्वातील ७२ व्या सामन्यावर गुजरात टायटन्सने नाव कोरलं आहे. गुजरातने चेन्नई सुपर किंग्जला सात गडी राखून धूळ चारली. चेन्नईने अगोदर फलंदाजी करत गुजरातसमोर विजयासाठी १३४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र गुजरातने हे आव्हान सात गडी राखून गाठले. या विजयानंतर गुजरात टायटन्सचे प्लेऑफमध्ये तसेच टॉप दोन संघांमध्ये स्थान निश्चित झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Prithvi Shaw Discharge : दिल्ली कॅपिट्लसचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉला मिळाला डिस्चार्ज, मैदानात कधी उतरणार?

चेन्नई संघाने नाणेफेक जिंकून गुजरातला विजयासाठी १३४ धावांचे आव्हान दिले. तर दुसरीकडे या धावांचा पाठलाग करताना गुजरातने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला. गुजरातचा सलामीवीर वृद्धीमान साहाने नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याने ५७ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि एक षटकार लगावत ६७ धावा केल्या.

हेही वाचा >>> ऋतुराज गायकवाडने रचला ‘हा’ अनोखा विक्रम, अर्धशतक झळकावत सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

साहाच्या या खेळीमुळे गुजरातला विजयापर्यंत पोहोचणे सोपे झाले. सलामीला आलेल्या शुभमन गिलला (१८) मोठी खेळी करता आली नाही. तर मॅथ्यू वेडदेखील फक्त वीस धावा करु शकला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला फक्त सात धावा करता आल्या. मात्र वृद्धीमा साहा आणि डेविड मिलर या जोडीने संघाला सावरत विजयापर्यंत पोहोचवलं.

हेही वाचा >>> गुजरात-चेन्नई संघाने अॅन्ड्र्यू सायमंड्सला वाहिली श्रद्धांजली, दंडाला बांधल्या काळ्या फिती

यापूर्वी नाणेफेक जिंकत चेन्नईने सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीच्या ऋतुराज गायकवाडने अर्धशतकी खेळ करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना धावा करण्यात यश आले नाही. ड्वेन कॉन्वे फक्त पाच धाव करु शकला. तर मोईन अली आणि एन जगदीशन यांनी अनुक्रमे २२ आणि ३९ धावा केल्या. या दोघांच्या खेळीचा संघाला चांगला फायदा झाला. महेंद्रसिंह धोनीने निराशा केली. त्याने फक्त सात धावा केल्या. परिणामी चेन्नई संघ वीस षटकांमध्ये फक्त १३३ धावा करु शकला.

हेही वाचा >>> शिखर धवन, हार्दिक पांड्या यांच्याकडे मोठी जबाबदारी, भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता

दुसरीकडे गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांना यशस्वी होऊ दिलं नाही. गुजरातच्या फलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळे चेन्नईचा ऋतुराज वगळता एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. मोहम्मद शमीने ड्वेन कॉन्वे आणि महेंद्रसिंह धोनी या दिग्गजांना बाद केलं. तर राशिद खान आणि अलझारी जोसेफ यांनी प्रत्येक एक बळी घेतला. तर चेन्नई संघाकडून गोलंदाजी विभागात मथिशा पथरिना याने चांगला खेळ केला. आपल्या पदार्पणातच त्याने दोन विकेट्स घेतल्या. तर मोईन अलीने एक बळी घेत गुजरातला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फायदा झाला नाही.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 gt vs csk gujarat titan defeat chennai super kings by seven wickets prd
First published on: 15-05-2022 at 19:30 IST