नवी मुंबई : सलग तीन पराभवांतून सावरत पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी कोलकाता नाइट रायडर्सचा संघ उत्सुक आहे. कोलकातापुढे शनिवारी ‘आयपीएल’ क्रिकेट गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या गुजरात टायटन्सचे  आव्हान असेल. पहिल्या चार सामन्यांपैकी तीन विजय मिळवणारा कोलकाताचा संघ पराभवांच्या मालिकेमुळे गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. त्यामुळे पहिल्याच हंगामात सहापैकी पाच विजय अशी वर्चस्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या गुजरातला हरवणे कोलकातासाठी आव्हानात्मक ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखालील गुजरातकडे दर्जेदार खेळाडू आहेत. परंतु हार्दिक दुखापतीमुळे चेन्नईविरुद्ध खेळू शकला नसताना रशीद खानकडे प्रभारी कर्णधारपद सोपवण्यात आले होते. रशीद (२१ चेंडूंत ४० धावा) आणि डेव्हिड मिलर (५१ चेंडूंत नाबाद ९४ धावा) यांनी संघाला विजय मिळवून दिला. कोलकाताच्या वेगवान माऱ्याची धुरा पॅट कमिन्स, उमेश यादववर आहे. सुनील नरिनही त्यांच्याकडे आहे. श्रेयस अय्यर, रसेल, नितीश राणा, वेंकटेश अय्यर यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी आहे.

  • वेळ :  दुपारी ३.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, सिलेक्ट १
मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 gujarat heavier kolkata recovering defeats victory return ysh
First published on: 23-04-2022 at 00:02 IST