पीटीआय, पुणे : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा संघ बुधवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात सलग तीन पराभवांची मालिका खंडित करण्यासाठी उत्सुक आहे. बंगळूरुची फलंदाजीची फळी झगडताना आढळत आहे, चेन्नईला गोलंदाजीची चिंता भेडसावत आहे.

बंगळूरुने आतापर्यंतच्या १० सामन्यांत पाच विजय आणि पाच पराभव पत्करले आहेत, तर चेन्नईचा संघ रवींद्र जडेजाकडून पुन्हा नेतृत्वसूत्रे महेंद्रसिंह धोनीकडे आल्यामुळे विजयपथावर परतला आहे. चेन्नईने नऊ सामन्यांपैकी फक्त तीन विजय मिळवले आहेत. बंगळूरुकडून आतापर्यंत फक्त सहा अर्धशतके नोंदली गेली आहेत. यापैकी दोन कर्णधार फॅफ डय़ूप्लेसिसने झळकावली आहेत.

Indian Premier League Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad sport news
बंगळूरुच्या गोलंदाजांकडे लक्ष!
rishbh pant
Ipl 2024, LSG vs DC: दिल्लीला कामगिरीत सुधारणेची आशा! आज लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान; राहुल, पंतकडे लक्ष
Wakad Police Arrest 10 for IPL Betting Extortion through Betting
पिंपरी : आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग; दहा जण अटकेत
Green signal for Suryakumar Yadav to play in IPL
IPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! सूर्यकुमार यादव झाला तंदुरुस्त, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता

कोहली, डय़ूप्लेसिसवर मदार

अनुभवी विराट कोहलीला सूर गवसल्यामुळे बंगळूरुची फलंदाजीची फळी अधिक मजबूत झाली आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध कोहलीने ५३ चेंडूंत ५८ धावा केल्या होत्या. कोहली (१८६ धावा) आणि डय़ूप्लेसिस (२७८ धावा) यांच्यावर बंगळूरुच्या सलामीची भिस्त आहे. युवा रजत पाटीदार गतहंगामातील ढिसाळ कामगिरीतून सावरतो आहे. दिनेश कार्तिक (२१८ धावा) आणि ग्लेन मॅक्स्वेल (१५७ धावा) यांनी विजयवीराचे सातत्य राखायला हवे. बंगळूरुच्या गोलंदाजीची मदार वानिंदू हसरंगा (१५ बळी), जोश हेझलवूड (१० बळी) आणि हर्षल पटेल (१० बळी) यांच्यावर आहे.

चेन्नईने सनराजयर्स हैदराबादला हरवून आपले आव्हान टिकवले आहे. शिवम दुबे (२४७ धावा), अंबाती रायुडू (२४६ धावा), ऋतुराज गायकवाड (२३७ धावा), रॉबिन उथप्पा (२२८ धावा) यांच्यावर चेन्नईच्या फलंदाजीची भिस्त आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजचे शतक एका धावेने हुकले होते. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्हो (१४ बळी) व मुकेश चौधरी (११ बळी) यांच्या खात्यावर बळी जमा असले तरी त्यांची षटकांमागे धावांची सरासरी अधिक आहे.

  • वेळ : सायं. ७.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १