मुंबई : सलग दोन सामन्यांत पराभव पत्करणारा कोलकाता नाइट रायडर्सचा संघ विजयी पुनरागमनासाठी उत्सुक असून सोमवारी ‘आयपीएल’मध्ये त्यांच्यापुढे राजस्थान रॉयल्सचे आव्हान असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोलकाताचा संघ आता सहा गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. दुसरीकडे, राजस्थानचा संघ पाच सामन्यांत सहा गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

श्रेयस, रसेलकडून अपेक्षा

कोलकाताच्या आंद्रे रसेलने यंदा अष्टपैलू कामगिरी करताना १७९ धावा केल्या असून पाच बळीही मिळवले आहेत. कर्णधार श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. गोलंदाजीत उमेश यादव वगळता इतरांना छाप पाडता आलेली नाही.

बटलर, चहलकडे नजर

जोस बटलर आणि यजुर्वेद चहल या राजस्थानच्या खेळाडूंनी यंदा चमकदार कामगिरी केली आहे. बटलरला शिम्रॉन हेटमायरची (१९७ धावा) चांगली साथ लाभली आहे.

*वेळ : सायं. ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 rajasthan royals vs kolkata knight riders match prediction zws
First published on: 18-04-2022 at 02:48 IST