scorecardresearch

RCB vs LSG : बाद झाल्यानंतर संतापलेल्या मार्कस स्टॉइनिसने केली शिवीगाळ; पहा VIDEO

पॅव्हेलियनच्या दिशेने जात असतानाही, मार्कस स्टॉइनिस तोंडावर हात ठेवून काहीतरी बोलताना दिसला,

Marcus Stoinis screams at umpire after getting bowled to Josh Hazlewood
(फोटो सौजन्य- सोशल मीडियावरुन साभार)

आयपीएल २०२२ च्या ३१ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने १८ धावांनी पराभव केला. या सामन्यात लखनऊ विजयाच्या जवळ होती पण मार्कस स्टॉइनिसची विकेट संघाला लक्ष्यापासून दूर घेऊन गेली. स्टॉइनिसला जोश हेझलवूडने बाद करून बंगळुरूला मोठे यश मिळवून दिले. विकेट पडल्यानंतर मैदानावर बरेच नाट्य रंगले होते. बाद झाल्यानंतर, स्टॉइनिस मैदानावरच शिवीगाळ करताना दिसला. स्टॉइनिसचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा प्रकार लखनऊ सुपर जायंट्सच्या डावातील १९व्या षटकात घडला आहे. पहिला चेंडू स्पष्टपणे वाईड दिसत होता, जो अंपायरने वाइड दिला नाही. यावर स्टॉइनिस नाराज दिसला. यानंतर पुढच्याच चेंडूवर हेझलवूडने स्टॉइनिसला क्लीन बोल्ड केले. बाद झाल्यानंतर तो खूप रागावलेला दिसत होता आणि शिवीगाळ करताना दिसला. या ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा आवाज स्टंपच्या माईकमध्ये कैद झाला आहे.

१९ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जोश हेझलवूडने मार्कस स्टॉइनिसला बोल्ड केले. मार्कस स्टॉइनिसला जोश हेझलवूडच्या या चेंडूवर स्लॉग स्वीप खेळायचा होता, पण तो तसे करू शकला नाही आणि बोल्ड झाला. आऊट झाल्यानंतर मार्कस स्टॉइनिस चांगलाच संतापलेला दिसला आणि यादरम्यान त्याला स्टंप माईकवर शिवीगाळ केल्याचे कैद झाले.

मार्कस स्टॉइनिसचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पॅव्हेलियनच्या दिशेने जात असतानाही, मार्कस स्टॉइनिस तोंडावर हात ठेवून काहीतरी बोलताना दिसला, परंतु तो कशाबद्दल आणि काय बोलत आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही.

स्टॉइनिसला वाटले की ज्या षटकात तो बाद झाला त्याचा पहिला चेंडू वाईड होता, पण पंचांनी तो वाइड दिला नाही. त्यामुळेच पुढच्या चेंडूवर त्याला बाहेर येऊन शॉट खेळावा लागला आणि त्याने आपली विकेट गमावली. स्टॉइनिसने १५ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २४ धावांची खेळी केली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्सचा १८ धावांनी पराभव करून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या ९६ धावांवर सुरुवात करताना सहा बाद १८१ धावा केल्या. लखनऊ सुपर जायंट्स संघ १६३ धावा करु शकला. या विजयासाठी बंगळुरुचा कर्णधार फॅफ डू प्लेसिसने महत्त्वाची भूमिका बजावली. तर बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहली मात्र शून्यावर बाद झाला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 rcb vs lsg marcus stoinis screams at umpire after getting bowled to josh hazlewood abn

ताज्या बातम्या