मुंबई : दिनेश कार्तिक (३४ चेंडूंत नाबाद ६६ धावा) आणि ग्लेन मॅक्सवेल (३४ चेंडूंत ५५) यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुनी शनिवारी ‘आयपीएल’च्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर १६ धावांनी मात केली. बंगळूरुचा हा सहा सामन्यांत चौथा विजय ठरला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बंगळूरुने दिलेल्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला २० षटकांत ७ बाद १७३ धावाच करता आल्या. डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ३८ चेंडूंत ६६ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने (१७ चेंडूंत ३४) एकाकी झुंज दिली. बंगळूरुच्या जोश हेझलवूडने (३/२८) सर्वोत्तम गोलंदाजी केली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तत्पूर्वी, बंगळूरुने ५ बाद १८९ अशी धावसंख्या उभारली. आघाडीच्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाल्यावर मॅक्सवेल, कार्तिक आणि शाहबाज अहमद (नाबाद ३२) यांच्या योगदानामुळे बंगळूरुने मोठी धावसंख्या केली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 royal challengers bangalore beat delhi bangalore four matches win ysh
First published on: 17-04-2022 at 01:47 IST