केकेआरला (KKR) सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध आव्हानात्मक धावसंख्या उभी करण्यात यश आलं. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने ८ विकेट गमावत १७५ धावा केल्या. सुरुवातीलाच विकेट पडूनही केकेआरने सामन्यात पुनरागमन करत चांगली धावसंख्या उभी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंद्रे रसेलने शेवटच्या क्षणात वेगवान फलंदाजी केली. अखेरच्या षटकात रसेलने २ षटकार आणि एक चौकार ठोकत २५ चेंडूत नाबाद ४९ धावांची खेळी केली. आंद्रे रसेलच्या या तुफान फटकेबाजीनंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या.

(आंद्रे रसेल फॉर्ममध्ये आला की क्षेत्ररक्षकाचा काहीही अर्थ नाही. चेंडू थेट दुसऱ्या पिनकोडवर जातो. हर्षा भोगले सारख्या कथाकाराशिवाय क्रिकेट इतकं चांगलं झालं नसतं.)

(शेवटच्या षटकाचा अधिकाधिक उपयोग करण्यासाठी आंद्रे रसेलवर विश्वास ठेवा.)

(अप्रतिम खेळी, आंद्रे रसेल पुन्हा एकदा अर्धशतकापासून एक इंच दूर राहिला.)

(महत्त्वाच्या धावांसाठी धन्यवाद रसेल)

(केन विलियमसनची विकेट चुकीची गेली. हैदराबादने शेवटच्या षटकात आणि तेही आंद्रे रसेल असताना फिरकीपटूला गोलंदाजी दिली नाही. पावरप्लेमध्ये लवकर विकेट जाऊनही केकेआरने सामन्यात चांगलं पुनरागमन केलं. केकेआरची गोलंदाजी पाहता त्यांनी सामन्यात चांगली जागा मिळवली आहे, आता एसआरएच बॅकफुटवर आहे.)

हेही वाचा : IPL 2022 SRH vs KKR match result : सनरायझर्स हैदराबादचा सलग तिसरा विजय, कोलकाताचा ७ विकेटने दारूण पराभव

आंद्रे रसेलच्या फलंदाजीचं कौतुक करणारे आणखी काही ट्वीट्स…

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 srh vs kkr social media reactions on batting of andre russell
First published on: 15-04-2022 at 23:03 IST