Naveen-Ul-Haq LSG vs MI IPL 2023: जेव्हा नवीन-उल-हक चेन्नईच्या खचाखच भरलेल्या चेपॉक स्टेडियममध्ये लखनऊ सुपरजायंट्सकडून खेळण्यासाठी निघाला तेव्हा त्याला विचित्र वागणूक मिळाली. जेव्हा तो गोलंदाजी करायला गेला किंवा कुठे क्षेत्ररक्षण करत असे तेव्हा जमावाने, चाहत्यांनी त्याला विराट-विराटच्या घोषणा देऊन चिडवायला सुरुवात केली. दरम्यान, अफगाणिस्तानी क्रिकेटपटूने मुंबई इंडियन्सविरुद्ध जबरदस्त गोलंदाजी करताना ४ विकेट्स घेतले. आकाश मधवालची दमदार कामगिरी नसती तर नवीनसाठी हा दिवस मोठा ठरला असता.

दरम्यान, सुपरजायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकने सांगितले की त्याला बुधवारी स्टेडियममध्ये ‘कोहली, कोहली’ चा घोषणांचा आनंद लुटला कारण यामुळे त्याला त्याच्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली. नवीन आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज कोहली यांच्यात सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या लीग टप्प्यात जोरदार वाद झाला होता.

ms dhoni thala joined hands being thankful to fan in ekana cricket stadium lsg vs csk ipl 2024 live match
थालाच्या भरमैदानातील ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने; VIDEO पाहून म्हणाले, “वॉव…”
Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Updates
KKR vs RR : कोलकातामध्ये आरआर आणि केकेआर यांच्यातील सामन्यात होऊ शकतो बदल, जाणून घ्या काय आहे कारण?
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024: केकेआरविरुद्ध ८३ धावांची खेळी करूनही विराट कोहली का होतोय ट्रोल? RCBचा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी
hardik pandya marathi news, hardik pandya mumbai indians marathi news
दोन सामने, दोन पराभव, दोन मोठ्या चुका! कर्णधार हार्दिक पंड्याचे डावपेच मुंबई इंडियन्ससाठी मारक ठरत आहेत का?

एमआय पलटणविरुद्धच्या सामन्यानंतर नवीन-उल-हकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट केली आहे. “माझ्या मनात खूप काही आहे आणि त्याबद्दल थोडे सांगायचे आहे. पण आत्ता मी एवढेच म्हणेन की लखनऊचे प्रशिक्षक, व्यवस्थापन आणि या प्रवासात सहभागी असलेल्या सहकारी खेळाडू आणि सर्वांचे प्रेम, पाठिंब्याबद्दल धन्यवाद, असं नवीन उल हकने म्हटलं आहे.” नवीन उल हकच्या या पोस्टची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.

मुंबईविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये ३८ धावांत चार बळी घेणारा नवीन म्हणाला, “मला मजा आली. मला मैदानावरील प्रत्येकाने त्याचे (विराट कोहली) किंवा इतर कोणत्याही खेळाडूचे नाव घेणे आवडते. यामुळे मला माझ्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रेरणा मिळते.” तो पुढे म्हणाला, “मी बाह्य गोष्टींचा विचार करत नाही. मी फक्त माझ्या क्रिकेट आणि माझ्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतो. चाहत्यांच्या घोषणांचा किंवा इतर कोणी काय म्हणतो याचा माझ्यावर परिणाम होत नाही.”

हेही वाचा: IPL 2023: चेन्नईचा माजी खेळाडू एमआय पलटणला घाबरतो, म्हणाला, “मुंबई-सीएसके सामना खेळू इच्छित नाही…”

नवीन म्हणाला, “व्यावसायिक खेळाडू म्हणून तुम्हाला त्याच्यासोबत जावे लागेल. जेव्हा तुम्ही तुमच्या संघासाठी चांगली कामगिरी करत नाही, तेव्हा चाहते तुम्हाला लक्ष्य करतील. जेव्हा तुम्ही तुमच्या संघासाठी चांगले काम करता तेव्हा हेच लोक तुमची प्रशंसा करतील. तो खेळाचा एक भाग आहे.”